माणसालाही लाजवेल अशी शहाणपणाची कृती; पाणी पिऊन माकडांनी बंद केला नळ, Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, प्रचंड गरमीने माकडांनाही त्रास झाला आहे. त्यांना उन्हाच्या झळा बसत आहेत. याचवेळी माकडे एका नळावर पाणी प्यायला आले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे या माकडांनी पाणी पिऊन झाल्यावर नळ बंद केला आहे. ज्यामुळे पाणी वाहून विनाकारण वाहून गेलेले नाही. त्यांच्या या कृतीने अनेकजण चकित झाले आहे. उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून नागरिकांना यातून धडा घेण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांना पाणी वाचवण्याचे आवाहन केले आहे.
समझदारी की बात, बेज़ुबान के साथ! प्यास बुझाने के बाद नल को बंद करने की यह ज़िम्मेदारी हर इंसान के लिए एक बड़ा सबक है। जब ये वन्यजीव जल का मोल समझ सकते हैं, तो हमें भी जागरूक बनना होगा। पानी बचाएं, भविष्य सुरक्षित बनाएं।#SaveWater #UttarakhandPolice pic.twitter.com/7HpNJGjlrM — Uttarakhand Police (@uttarakhandcops) June 8, 2026
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @uttarakhandcops या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर विविध प्रतिक्रिया उमटत आहे. एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, यावरुन वाटते की माकडे माणसांचे पूर्वज नव्हते, तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने पाणी वाचवण्याचा असा संदेश कदाचित कोणत्या जाहीरातीतून मिळेल असे म्हटले आहे. तर तिसऱ्या एकाने, ही माकडे माणसांपेक्षाही जबाबदार आहेत.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






