(फोटो सौजन्य – Instagram)
काय घडलं व्हिडिओत?
सोशल मीडियावर एक हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक तरुणी डोंगरावरून खाली उतरण्यासाठी धडपडत असलेल्या वासराला आपल्या पाठीवर बसवून घेऊन जाताना दिसून आली. व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे, मुलीचे नाव रेखा कैथ असे आहे. ती नवजात वासराला पाठीवर घेऊन जात असते जेणेकरून गाय तिच्या मागे सुरक्षितपणे घरी परत येईल. डोंगराळ भागात चित्रित केलेला हा व्हिडिओ पहाडी महिलांच्या शांत शक्ती आणि करुणेचे दर्शन घडवतो, ज्या अनेकदा सहजतेने आणि सहानुभूतीने कठीण परिस्थितीतून मार्ग काढतात.
पुढे असेही सांगण्यात आले आहे की, हिमाचल प्रदेशासारख्या प्रदेशात, पशुधन हे केवळ ग्रामीण जीवनाचा भाग नाही तर इथे त्यांना कुटुंबासारखे वागवले जाते. हे दृश्य त्या चिरस्थायी नात्याचे एक सुंदर प्रतिबिंब आहे. मुलीच्या धाडसाने, करुणेने आणि मानवतेने सर्वांची मने जिंकली. धोकादायक आणि खडतर प्रदेश असूनही, तिने वासराला सुरक्षित ठिकाणी नेले. या उल्लेखनीय कृतीने लोकांना भावूक केले असून व्हिडिओ सध्या वेगाने इंटरनेटवर शेअर केला जात आहे.
कामं नाही, पासपोर्टही जप्त… मलेशियात अडकलेल्या भारतीयासोबत क्रूर वागणूक, ‘तो’ धक्कादायक VIDEO VIRAL
हा व्हायरल व्हिडिओ @kiddaan नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “पुकी वासरू” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “खरं प्रेम” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “गाईने तिच्यावर विश्वास ठेवला हे मला आवडलं”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






