(फोटो सौजन्य: Instagram)
मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षक आणि तरुणी मागील बऱ्याच महिन्यांपासून एकेमेकांच्या संपर्कात होते. यादरम्यानच जेव्हा शिक्षक प्रेमिकाला भेटायला आला तेव्हा गावकऱ्यांनी त्यांना एकत्र पाहिलं. यानंतर दोन्ही घरातील कुटुंबियांनी बोलोवण्यात आलं आणि गावात या गोष्टीवर पंचायत ठेवण्यात आली. गावकऱ्यांसमोर दोन्ही पक्षांची मतं विचारण्यात आली. याचबरोबर लग्नाबाबतही दोघांना विचारले असता दोघांनी याला सहमती दर्शवली. यानंतर कुटुंबिय आणि गावकऱ्यांच्या उपस्थित चट मंगनी पट बिहा करत लगेचच त्यांना लग्नबंधनात अडकवण्यात आलं.
तरुणाने सांगितले की, त्याच तरुणीवर खूप प्रेम आहे आणि त्याला तिच्याशी लग्न करण्याची इच्छा आहे. दुसरीकडे तरुणीनेही सहमती दर्शवत आपल्या प्रेमाची कबुली दिली. तरुणीच्या आईने सांगितले की, दोघे आधीपासून एकमेकांच्या संपर्कात होते ज्याची माहिती कुटुंबियांना सुरुवातीपासून होती. तरुणाच्या भावाने सांगितले की, दोघांचे लग्न झाले आहे आणि सर्वांनी या नात्याचा आनंदाने स्वीकार केला आहे. तथापि, तरुणाने सांगितले की, बऱ्याच काळापासून त्यांचे प्रेमप्रकरण सुरु होते. लग्नासाठी त्याने ८ वर्षांचा काळ ठरवला होता पण गावकऱ्यांनी जबरदस्तीने घाईघाईत लग्न लावून दिले.
View this post on Instagram
दरम्यान या घटनेचा व्हिडिओ @viral_ka_tadka नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये वधू, वर आणि त्यांच्या आजूबाजूला गावकऱ्यांचा मोठा जमाव एकत्र जमल्याचे दिसते. दोघांनी गळ्यात हार घातलेले असते तर तरुणीच्या भांगेत सिंदूर भरलेले दिसते. एका भेटीमुळे त्यांचे आयुष्य इतके बदलेल याचा जोडप्याने विचार केला नसावा, पण अखेर त्यांच्या प्रेमकहाणीचा शेवट विवाहबंधनात झाला.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






