'अप्सरा आली...', गाण्यावर प्रोफेसरचा कडक डान्स; विद्यार्थींनीसोबत धरला ताल, VIDEO VIRAL (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
हा व्हिडिओ आचार्य इनिस्टिट्यूट मधील आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की, काही विद्यार्थीनी आणि प्रोफेसर इन्स्टिट्यूटच्या आवारात नृत्य करत आहे. अप्सरा आली या गाण्यावर विद्यार्थीनी आणि प्रोफेसरने ताल धरला आहे. प्रोफसर केवळ डान्स करत नसून त्यांच्या चेहऱ्यावरही अप्रतिम एक्सप्रेशन्स आहेत. हा व्हिडिओ अनेकांना आवडला असून असे प्रोफेसर्स आम्हाला का नाहीत मिळत असे म्हटले आहे. लोकांच्या म्हणण्यानुसार, शिक्षक जेव्हा एखादा विषय सोडून किंवा मुलांचे मित्र होऊन त्यांच्यासोबत वावरता, तेव्हा विद्यार्थ्यांनाही शिकण्याचा उत्साह अधिक येतो. असे शिक्षक फार कमी असतात.
मैत्री असावी तर अशी! Cancer मुळे गेले केस…तिच्या हिंमतीसाठी शाळातील सर्व विद्यार्थ्यांनी केले मुंडन
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा @acharyainstitutes या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. याव्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, जेव्हा शिक्षक विद्यार्थ्यांची वाईब मॅच होते, तेव्हा एक वेगळीच उर्जा निर्माण होते असे म्हटले आहे. यावर अनेकांनी हार्टचे इमोजी शेअर करत विद्यार्थी आणि प्रोफेसरच्या नृत्याला अप्रतिम म्हटले आहे. एका नेटकऱ्याने जेव्हा प्रोफेशन आणि पॅशन एकच असते, तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने प्रोफेसरने सर्वांची मने जिंकली असे म्हटले आहे. अनेकजण प्रोफेसरचे कौतुक करत आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






