(फोटो सौजन्य: X)
काय आहे प्रकरण?
कथेची सुरुवात होते २०१६ साली जेव्हा आशिष तिवारी नावाच्या तरुणाचं पिंकी नावाच्या मुलीशी लग्न होत. दोघांच्याही लग्नाला ९ वर्षे लोटली असून त्यांना दोन मुले देखील आहेत. पण म्हणतात ना सर्व सुखी चालत असलं की त्यात तिसऱ्याची एंट्री ही होतेच…आशिषला बऱ्याच काळापासून आपला पत्नीवर संशय होता. अशात पत्नीला तिच्या प्रियकरासोबत रंगेहात पकडण्यासाठी त्याने सापळा रचला आणि पिंकीला अमित शर्मा नावाच्या तिच्या प्रियकरासोबत रंगेहात पकडलं. पुढे हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहचलं. घडलेल्या प्रकारावर पंचायत बसली, चर्चा झाली. पिंकी प्रियकराला सोडायला तयार नाही तर आशिषदेखील परत जाण्यास नकार देत होता. अखेर मनाचा मोठेपणा दाखवत पतीनेच पत्नीचं तिच्या प्रियकरासोबत लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने सर्वांनाच धक्का दिला असून हे प्रकरण आता सोशल मीडियावर चांगलच चर्चेत आहे. दरम्यान आशिषच्या दोन्ही मुलांनी आईकडे न जाता, वडिलांसोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रतापगढ़ में शादी के 10 साल बाद पति आशीष तिवारी ने अपनी पत्नी पिंकी की शादी उसके प्रेमी अमित शर्मा से करवा दी। पति और बच्चों की मौजूदगी में ही गांव के मंदिर में दोनों ने एक-दूसरे के गले में वरमाला डाली। शादी के बाद सबके सामने पत्नी ने बॉयफ्रेंड के पैर छुए। हालांकि, जब महिला ने… pic.twitter.com/CfoFAZXUIL — Rajesh Sahu (@askrajeshsahu) January 19, 2026
घटनेचे हे दृश्य @askrajeshsahu नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आले आहे. अनेक युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “ही खरोखरच धक्कादायक घटना आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अगदी योग्य निर्णय. आजच्या काळात, आत्महत्या करण्यापेक्षा अशा परिस्थितीत असे निर्णय घेणे शहाणपणाचे आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “मला आश्चर्य वाटते की, येणारे भविष्य कसे असेल”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






