(फोटो सौजन्य: Instagram)
सुरक्षेची सर्व संसाधने सोबत घेऊन ती आकाशात झेप घेते आणि तिथल्याच एका ढगावर चालून दाखवते. या घटनेचा व्हिडिओ तरुणीने आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केला असून सोशल मिडियावर हा व्हिडिओ अलिकडे जोरदार व्हायरल होत आहे. तरुणीचा कर्तब पाहून यूजर्स अवाक् असून अनेक वर्षांपासूनचे लोकांचे स्वप्न तिने अखेर पूर्ण करुन दाखवले अशा प्रतिक्रिया यूजर्स व्हिडिओला देत आहेत. चला व्हिडिओतील दृष्यांविषयी सविस्तर जाणून घेऊया.
काय दिसलं व्हिडिओत?
मिळालेल्या माहितीनुसार, व्हिडिओत दिसून आलेल्या महिलेचे नाव माया कुचिंस्का असून ती एक एरियल एथलीट आहे. याचा अर्थ ती हवेत कर्तब करुन दाखवण्यात सराईत आहे. स्कायडाव्हिंग आणि इंडोर स्कायडाव्हिंगसाठी माया खास करुन ओळखली जाते. इतकंच नाही तर हवेच चालणारी मुलगी या नावानेही तिला ओळखलं जातं. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्येही ती एका पांढऱ्या ढगावरुन मूनवाॅक करताना दिसते. मुख्य म्हणजे यावेळी तिचा तोल डगमगत नाही आणि फार सराईतपणे ती तोल सांभाळत एक स्मूद वाॅक करुन दाखवते ज्याला पाहून सर्वच थक्क होतात. अनेकांना पहिल्या दृष्टीक्षेपात हे दृष्य एडिटेड किंवा एआयच्या मदतीने क्रिएट केल्यासारखे वाटते पण वास्तविक हे खरेखुरे दृष्य आहे ज्यात माया आपले काैशल्य लोकांसमोर सादर करत असते.
View this post on Instagram
हा व्हिडिओ @kuczynska.maja नावाच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘ढग इतके सुंदर होते की मला थोडं चालावंसं वाटलं. जणू काही जमिनीवर एखादा मऊ-मुलायम गालिचाच पसरला होता’. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या घटनेवर आपले मत देखील व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “अस वाटतंय रेडबुलने तिला खरंच पंख दिले”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे फारच सुंदर आहे” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “तिचा कॅमेरामन अविश्वसनीय आहे; हवेत असतानाही त्याचे कॅमेऱ्यावर उत्कृष्ट नियंत्रण होते.”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






