
23 लाख लोकसंख्या असलेल्या गाझामध्ये हवाई हल्ल्यांमुळे लोकांना घरे सोडावी लागली आहेत. आतापर्यंत 423,000 लोक विस्थापित झाले आहेत.
इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या सात दिवसांपासून युद्ध (Israel Hamas war) सुरू आहे. या युद्धात 1500 हून अधिक लोक मारले गेले आहेत. हमासच्या हल्ल्यानंतर प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यात मोठ्या संख्येने पॅलेस्टिनीही मारले गेले. इस्रायलने लष्कराने गाझा सीमेवर ताबा मिळवला आहे. इस्रायली हवाई दलाने गाझा पट्टीतील हमासच्या लक्ष्यांवर बॉम्बफेक सुरूच ठेवली आहे
इस्रायलची गाझा पट्टीतील हमासवर बॉम्बफेक सुरू
इस्रायली हवाई दलाने गाझा पट्टीतील हमासच्या लक्ष्यांवर बॉम्बफेक सुरूच ठेवली आहे. इस्रायलच्या हल्ल्यामुळे गाझामध्ये आतापर्यंत 1537 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 6612 जण जखमी झाले आहेत. इस्रायलने गाझा पट्टीवर आतापर्यंत 6000 हून अधिक बॉम्ब टाकले आहेत. इस्रायलचा दावा आहे की त्यांनी हमासची 3600 हून अधिक लक्ष्ये नष्ट केली आहेत. इस्रायली लष्कराने गाझा पट्टीजवळ आपले रणगाडे तैनात केले आहेत. लष्कराने गाझा पट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांना जागा रिकामी करण्याचा अल्टिमेटम दिला आहे
खरं तर हमासने शनिवारी गाझा पट्टीतून इस्रायलवर हजारो रॉकेट डागले होते. एवढेच नाही तर हमासच्या मुलांनी हवाई, सागरी मार्ग आणि सीमेद्वारे इस्रायलच्या हद्दीत घुसून नागरिकांवर हल्ले केले होते. या हल्ल्यांमध्ये इस्रायलमध्ये 1200 लोकांचा मृत्यू झाला आहे. एवढेच नाही तर हमाने शेकडो लोकांना ओलीसही घेतले. तेव्हापासून इस्रायल गाझा पट्टीतील हमासच्या लक्ष्यांवर हवाई हल्ले करत आहे. 23 लाख लोकसंख्या असलेल्या गाझामध्ये हवाई हल्ल्यांमुळे लोकांना घरे सोडावी लागली आहेत. आतापर्यंत 423,000 लोक विस्थापित झाले आहेत. यातील बहुतांश लोक यूएनद्वारे चालवल्या जाणाऱ्या शाळांचा आधार घेत आहेत.
भारतानं राबवलं ‘ऑपरेशन अजय’
भारत सरकारने सुरू केलेल्या ‘ऑपरेशन अजय’ अंतर्गत २१२ भारतीय परत आले आहेत. आज सकाळी दिल्ली विमानतळावर पहिले विमान उतरले. यामध्ये महिला, वृद्ध आणि लहान मुलांसह एकूण २१२ भारतीयांचा समावेश आहे. मायदेशात परताच या भारतीयांनी सुटकेचा श्वास सोडला असून, मोदी सरकारचे आभार मानले आहेत. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी दिल्ली विमानतळावर या नागरिकांचे स्वागत केले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं व्हिडीओ पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.