भूकंपाच्या जोरदार धक्क्यांनी पुन्हा हादरला 'हा' आशियाई देश ; ७.० रिश्टर स्केल तीव्रता (फोटो सौजन्य: iStock)
Taiwan Earthquake: तैवान हादरले! 6.1 रिश्टर स्केलचा भूकंप; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
या भूकंपाच्या चार दिवस आधीच तैवानच्या आग्नेय किनाऱ्यावरील तैतुंग भागात शक्तिशाली भूकंपाचे धक्के जाणवले होते. 6.1 रिश्टर स्केल अशी याची तीव्रता नोंदण्यात आली होती. सुदैवाने या भूंकपावेळी देखील कोणत्याही प्रकारची जीवित वा वित्त झाली नाही. पंरतु या भूकंपामुचे धक्के मोठ्या प्रमाणात जाणवले होते. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळाले. या भूकंपाचा केंद्रबिंदू हा तैतुंगच्या उत्तरेला १० किलोमीटर खोल होता. या भूकंपामुळे तैवानच्या राजधानी आणि आसपासच्या शहरांमध्ये देखील भूकंपाच्या धक्के जाणवले. यामुळे घरांच्या, इमारतींच्या भींती हादरल्या होत्या.
तैवान हा दोन टेक्टोनिक प्लेट्सच्या जंक्शनजवळ स्थित आहे. यामुळे या भागात सतत टेक्टोनिक प्लेट्सचे घर्षण होत असते. ज्यामुळे यातील ऊर्जा बाहेर पडून तैवानला भूकंपाचे धक्के जाणवतात. तैवान हा भूकंपप्रवण देशांपैकी एक देश आहे. यापूर्वी २०१६ मध्ये मोठ्या भूकंपाच्या झटक्याने तैवान हादरला होता. यामध्ये १०० हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले होते, तर यानंतर दुसरा सर्वात मोठा भूकंपा हा १९९९ मध्ये झाला होता, ज्याची तीव्रवता ७.३ रिश्टर स्केल होती. यामध्ये २००० हून अधिक लोकांचा बळी गेला होता.
पृथ्वीचे कवच हो मोठ्या प्लेट्समध्ये विभागले गेलेल आहे. या टेक्टोनिक प्लेट्स असे म्हटले जाते. या टेक्टोनिक प्लेट्स सतत एकमेकांवर आदळत असतात. यामुळे यातून ऊर्जा बाहेर पडत असते. ही ऊर्जा बाहेर पडत असताना जमिनींची जोरदार हालचाल होते, ज्यामुळे भूकंप होतात.






