अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि लेबनॉनचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ आउन (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Iran Attack Kuwait : इराण-अमेरिका संघर्षाचा फटका कुवैतला; पाणीपुरवठा यंत्रणा धोक्यात?
अब्राहम अकॉर्ड्स हा अमेरिका, इस्रायल आणि अरब देशांमधील संबंध सामान्य करण्यासाठी करण्यात आलेला महत्त्वाचा करार आहे. या कराराचा उद्देश मध्यपूर्वेत शांतता आणि सहकार्याला चालना देण्याचा होता. अमेरिकेकडून यामुळे अरब देश आणि इस्रायलमध्ये शांतता आणि सहकार्य प्रस्थापित झाल्याचा दावा सतत करण्यात येतो. ट्रम्प यांनीही या करारा ऐतिहासिक संबोधले असून आता यामध्ये लेबनॉनचीही एन्ट्री होण्याची शक्यता आहे.
ट्रम्प आणि लेबनॉनच्या राष्ट्राध्यक्ष जोसेफ यांच्या बैठकीत इस्रायलशी संपर्क आणि संबंधावर असलेल्या कायदेशीर निर्बंधाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी ट्रम्प यांनी या मुद्द्यावर लेबनॉनच्या अध्यक्षांशी चर्चा केली जाईल असे म्हटले होते. दोन्ही देशांत दीर्घकाळापासून संबंध ताणलेले असताना, ट्रम्प यांच्या विधानाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते.
या बैठकीनंतर ट्रम्प यांनी लेबनॉनची अब्राहम करारात सामील होण्याची शक्यता वर्तवली होती. परंतु दुसरीकडे, लेबनॉनचे अध्यक्ष जोसेफ आउन यांनी या करारा थेट उल्लेख टाळला. त्यांनी प्रादेशिक स्थिरता आणि सहार्यासाठी राजनैतिक प्रयत्न सुरु असल्याचे म्हटले. तसेच लेबनॉन आणि इस्रायलमधील संघर्ष संपुष्टात आला तर हे प्रदेशिक स्थिरतेसाठी फायदेशीर ठरेल असेही त्यांनी म्हटले.
दरम्यान दक्षिण लेबनॉनमधून इस्रायली सैन्याच्या माघार घेण्यावरही ट्रम्प यांनी भाष्य केले. त्यांनी म्हटले की, इस्रायल लेबनॉनमधून माघार घेणार असून लेबनॉनी सशस्त्र दलांना अमेरिकेचा पाठिंबा राहील. सध्या ट्रम्प यांच्या या विधानानंतर मध्यपूर्वेत शांततेची आशा निर्माण झाली आहे. यावर इस्रायल काय प्रतिक्रिया देईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान ट्रम्प यांनी अमेरिका आणि लेबनॉनमध्ये संबंध अधिक मजबूत करण्यावर भर दिला. सुरक्षा क्षेत्रासोबतच व्यापार, गुंतवणूक आणि वाहतूक सहकार्य वाढवण्यावर चर्चा झाली. दोन्ही देशात थेट विमानासेवाही सुरु होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.






