काबुल : अल कायदाचा (Al Qaeda) प्रमुख अल-जवाहिरी (Al Zawahiri) अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार झाल्यानंतर लगेचच संघटनेने नवीन प्रमुख निवडला आहे. कुख्यात दहशतवादी अल-आदेल (Saif al Adel) याची अल कायदाचा नवा म्होरक्या म्हणून निवड करण्यात आली आहे.
लादेननंतर अमेरिकेसाठी असलेला दुसऱ्या क्रमांकाचा दहशतवादी अल जवाहिरी याचा ड्रोन हल्ल्यात खात्मा केला आहे. काबूलमध्ये (Kabul) सीआयएने केलेल्या ड्रोन हल्ल्यात जवाहिरी मारला गेला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अफगाणिस्तानातील दहशतवादविरोधी मोहिमेतील हे अमेरिकेचे सर्वात मोठे यश आहे. आता अल-जवाहिरीच्या मृत्यूनंतर अल आदेल अल कायदाचा नवा म्होरक्या बनला आहे. अल आदेलचे नाव सैफ अल-आदेल (Saif al Adel) आहे.






