मोगादिशु : सोमालियाची (Somalia) राजधानी मोगादिशूमध्ये (Mogadishu) दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला (Terrorist Attack) सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले आहे. मात्र, यामध्ये १५ जणांचा मृत्यू झाला आहे. दहशतवाद्यांनी हॉटेल हयातवर हल्ला केला. हे सर्व दहशतवादी अल शबाब (Al-Shabab) या संघटनेचे असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, हॉटेलमधील सर्व दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे.
अल-शबाब या दहशतवादी संघटनेच्या बंदुकधारींनी सोमालियातील एका हॉटेलवर हल्ला केला. हयात हॉटेलवर अल-शबाबच्या हल्ल्यातील मृतांची संख्या १५ वर पोहोचली आहे. मात्र, सरकारकडून अद्याप अधिकृत आकडेवारी सादर करण्यात आलेली नाही. हल्ल्यात बळी पडलेल्यांमध्ये व्यापारी, मौलवी, सरकारी कर्मचारी यांचा समावेश आहे. तब्बल १४ तास सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना लढा दिला. अखेर सर्व दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. या हल्ल्याची जबाबदारी अल-कायद्याशी (Al-Qaeda) संलग्न असलेल्या अल-शबाब गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दोन कारमध्ये बॉम्बस्फोट केल्यानंतर शस्त्रांसह दहशतवाद्यांनी हॉटेलमध्ये गोळीबार केला. ज्यामध्ये अनेक लोक जखमी झाले आणि अनेकांचा मृत्यू झाला. अल-कायदाशी संबंधित अल-शबाब गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. दहशतवाद्यांनी इमारतीत घुसण्यापूर्वी हॉटेलच्या बाहेर स्फोट केले. सुरक्षा दल आणि हॉटेलमध्ये लपलेले दहशतवादी यांच्यात शनिवारी सकाळपर्यंत चकमक सुरू होती. तब्बल १४ तासांनी ऑपरेशन संपले असून सर्व दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे.






