इम्रान खानचे अस्तित्त्व मिटवणार मुनीर? PTI पक्षावर बंदी घालण्याच्या तयारीत (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
कुत्र्याची शेपुट वाकडी ती वाकडीच! CDF होताच असीम मुनीरची भारताला पोकळ धमकी
CDF म्हणून निवड झाल्यानंतर मुनीर असीम मुनीर यांच्यावर आणि त्यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षावर देशद्रोहाचा खटला चालवण्याची तयारी करत असल्याचे म्हटले जात आहे. सध्या मुनीर पाकिस्तानमध्ये सर्वात शक्तिशाली असून त्यांना पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचा पाठिंबाही मिळत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्त्वाखाली पाकिस्तान सरकार आणि लष्कर यांच्या मते, इम्रान खान यांनी राष्ट्रीय सुरक्षेचे उल्लंघन केले आहे.
त्यांच्यामुळे पाकिस्तानचे सौदी अरेबिया, चीन आणि अमेरिकेसोबत राजनैतिक संबंध बिघडले आहेत. यामुळे त्यांच्यावर अस्थिरता पसरवण्याचा आणि देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करण्याचा आरोप मुनीरने केला आहे. या अंतर्गत खान यांच्यावर देशद्रोहाच खटाल देखील चालवला जाणार आहे. मुनीरच्या मते, खान यांच्या राजकीय विरोधामुळे देशात अस्थिरता निर्माण होत आहे. यामुळे पाकिस्तान सरकारच्या अडची वाढत आहेत. तसेच खान यांचा टीटीपी आणि अफगाण तालिबान बद्दलचा दृष्टीकोनही देशासाठी धोकादायक असल्याचे मुनीरने म्हटले आहे.
पाकिस्तान लष्कराने एखाद्या नेत्याला देशासाठी धोकादायक ठरवण्याची ही पहिलीच वेळ नाही. पाकिस्तानमध्ये सत्ता संघर्ष हा देशाच्या स्थापनेपासूनच सुरु आहे. लोकशाही वादी नेते आणि लष्करामध्ये अनेक दशकांपासून वर्चस्वाची लढाई सुरु आहे. यापूर्वी पाकिस्तानच्या लष्कराने फातिमा जिन्ना, बेनजीर भुट्टो आणि सध्याच्या घडीला इम्रान खान यांना राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक म्हणत त्यांच्यावर देशद्रोहाचा ठपका लावला आहे.
इम्रान खान २०२३ पासून तुरुंगात कैद आहेत. त्यांच्यावर तुरुंगहात अत्याचाराच्या, एकाकीकरणाच्या आणि भेटींवर निर्बंधाच्या तक्रारी आल्या आहेत. त्यांच्या कुटुंबीयांच्या मते, खान यांना जाणूनबुजून त्रास दिला जात आहे. त्यांची लोकप्रियता कमी करण्यासाठी मुनीरने त्यांच्यावर देशद्रोहाचा लेबल लावले आहे. सध्या परिस्थिती अधिक बिकट झाली आहे.
फातिमा जिना ते इम्रान खान… पाकिस्तानचे नेते ज्यांच्यावर लष्कराने लादला देशद्रोहाचा ठपका, जाणून घ्या






