CDF Delay : पाकिस्तानच्या सत्ताकारणाची लंडनमध्ये लिहिली जातेय स्क्रिप्ट; नवाज शरीफ करणार असीम मुनीरसोबत मोठा गेम ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
या गोंधळाला अधिक गूढतेचा रंग पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या अचानक लंडन दौऱ्यामुळे मिळाला आहे. स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, शाहबाज शरीफ हे आपल्या मोठ्या भावाशी, माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याशी सल्लामसलत करण्यासाठी लंडनला गेले होते. त्यानंतर मात्र ते पाकिस्तानात परतलेले नसून, या काळात असीम मुनीर यांच्या नियुक्तीची प्रक्रिया थांबली आहे. त्यामुळे “लंडनमध्ये नवीन राजकीय स्क्रिप्ट लिहिली जात आहे का?” असा प्रश्न आता चर्चेत येत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘India-Russia’ची लष्करी युती जागतिकस्तरावर आणखी बळकट; RELOSमंजुरीनंतर रशियाने ‘या’ खास मैत्रीचे गायले गोडवे
नवाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्यातील संभाव्य सौदेबाजीबद्दल राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. काही विश्लेषकांच्या मते, जर मुनीर यांची संरक्षण प्रमुख म्हणून नियुक्ती झाली तर ते केवळ लष्करच नव्हे, तर हवाई दल आणि नौदलावरही सर्वाधिकार मिळवू शकतात. पाकिस्तानच्या संविधानात झालेल्या अलीकडील बदलांमुळे संरक्षण प्रमुखाच्या पदाला असामान्य शक्ती प्राप्त झाल्या आहेत. या पदावर असलेली व्यक्ती हयात असताना तिच्यावर कोणत्याही प्रकारची न्यायालयीन कारवाई होऊ शकणार नाही, तसेच ‘फिल्ड मार्शल’ ही पदवी आयुष्यभर कायम राहू शकते.
यापूर्वी पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी सत्ता हस्तगत करून किंवा लष्करी उठावाद्वारे असे अधिकार मिळवले आहेत, मात्र हा पहिलाच प्रसंग आहे की संविधानाद्वारे हे सर्व अधिकार एका व्यक्तीच्या हाती जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक राजकीय विश्लेषक, मानवाधिकार संघटना आणि आंतरराष्ट्रीय निरीक्षक “घोषित हुकूमशाही”ची भीती व्यक्त करत आहेत.
Aaloo Paneer Still waiting for official notification for to become CDF, Pakistan Prime Minister Shehbaz Sharif is deliberately avoiding to issue the notification.. @ajaykraina@col_chaubey @samartoor3086#PKAKB #Rawalpindi #ImranKhan #imrankhanPTI pic.twitter.com/IsXYkvPMQE — Mritunjay Kumar (@Mritunjayrocks) December 2, 2025
credit : social media and Twitter
संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी ३० नोव्हेंबर रोजी माध्यमांशी बोलताना योग्य प्रक्रिया सुरू असल्याचे सांगून टाळाटाळ केली होती. मात्र त्यानंतर सरकारमधील कोणत्याही वरिष्ठ नेत्याने यावर अधिक भाष्य केलेले नाही. या मौनामुळे संशयाला अधिकच बळ मिळत असून, देशांतर्गत अस्थिरतेची भीती वाढत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘असा पराभव करू की, Peace Plan साठी कोणीही उरणार…’ ; रशियन PM Putin यांच्या आक्रमक विधानाने संपूर्ण जगाचे लक्ष मॉस्कोकडे वळवले
सध्याच्या परिस्थितीत, पाकिस्तानमध्ये लोकशाही टिकेल की लष्कराचा प्रभाव अधिक वाढेल, हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आणि निर्णायक ठरत आहे. असीम मुनीर यांची नियुक्ती होणार की नाही, आणि ती कधी होणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले असून पुढील काही दिवसांत पाकिस्तानच्या राजकारणाचा आणि लष्करी व्यवस्थेचा प्रवाह ठरू शकतो.
Ans: पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या लंडन दौऱ्यामुळे प्रक्रिया थांबली आहे.
Ans: या पदावर सर्व लष्करी शाखांवर पूर्ण नियंत्रण मिळते.
Ans: संविधानिक अधिकारांमुळे त्या दिशेने परिस्थिती झुकू शकते.






