रशियाचे युक्रेनविरुद्धचे आक्रमण सहाव्या दिवशीही सुरूच आहे. युक्रेनच्या राजनयिकाने यूएन जनरल असेंब्लीला सांगितले की, रशियन हल्ल्यात आतापर्यंत 16 मुलांसह 352 युक्रेनियन ठार झाले आहेत. अजूनही गोळीबार सुरू असून त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितले की, गेल्या पाच दिवसांत रशियाने युक्रेनवर 56 रॉकेट आणि 113 क्रूझ क्षेपणास्त्रे डागली आहेत. रशियाच्या हिंसक कारवायांदरम्यान दोन्ही देश तणाव कमी करण्यासाठी राजनैतिक प्रयत्नही करत आहेत. काल रात्री दोन्ही देशांनी बेलारूस-युक्रेन सीमेवर 6 तास चर्चा केली, पण ती अनिर्णित ठरली.
युक्रेनच्या सीमेवर तैनात असलेल्या सुमारे ७५% रशियन सैन्याने युक्रेनमध्ये प्रवेश केल्याचे अमेरिकन संरक्षण विभाग पेंटागॉनने म्हटले आहे. तथापि, पाश्चात्य देशांचे म्हणणे आहे की रशियन सैन्याला रसद समस्यांमुळे वेगाने पुढे जाता येत नाही.
[read_also content=”संभाजी भिडेंनी पुन्हा केलं वादग्रस्त वक्तव्य, डॉक्टरांना म्हणाले लुटारू https://www.navarashtra.com/amravati/vidarbha/amravati/sambhaji-bhide-again-made-a-controversial-statement-telling-the-doctor-to-rob-nrps-247124.html”]