“हा तोच देश आहे जिथे लादेन लपला होता” पाकिस्तानवर थेट प्रहार
प्रीती पटेल यांनी आपल्या भाषणात पाकिस्तानातील दहशतवादी गटांचे उघड उघड समर्थन करणाऱ्या धोरणांवर कठोर टीका केली. त्यांनी ठामपणे सांगितले,
“हा तोच देश आहे जिथे ओसामा बिन लादेन लपला होता. आजही त्या देशात दहशतवादी नेटवर्क वाढत आहेत, हा केवळ योगायोग नाही.”
त्यांनी स्पष्टपणे म्हटले की, पाकिस्तानमध्ये कार्यरत असलेले दहशतवादी गट केवळ भारतासाठीच नव्हे, तर ब्रिटनसह संपूर्ण पाश्चिमात्य जगासाठी धोका बनले आहेत. त्यामुळे ब्रिटिश सरकारने या गटांविरोधात कठोर भूमिका घ्यावी आणि त्यांची ओळख पटवून ठोस पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी त्यांनी संसदेत केली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : काय सत्य अन् काय तथ्य! ‘Operation Sindoor’नंतर पाकिस्ताननेही भारताचे पाच फायटर जेट पाडले…; पाक लष्करी प्रवक्त्यांचा दावा
‘ऑपरेशन सिंदूर’चा जागतिक स्तरावर प्रभाव
भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेमुळे पाकिस्तानप्रेरित दहशतवादी संघटनांना मोठा झटका बसला आहे. ९ दहशतवादी अड्ड्यांवर यशस्वीपणे हल्ले करून भारताने पुन्हा एकदा दहशतवाद्यांना कुठेही सुरक्षित आश्रय मिळू शकत नाही, हे दाखवून दिले.
प्रीती पटेल यांनी भारताच्या या कारवाईचे कौतुक करताना म्हटले की,
“स्वतःचे रक्षण करण्यासाठी आणि त्या घृणास्पद दहशतवादी संरचना नष्ट करण्यासाठी भारताने घेतलेली कारवाई योग्य आणि प्रमाणबद्ध आहे.”
Today in the House of Commons I reiterated my condolences for those impacted by the atrocity that took place in Pahalgam. We must stand with those affected by terrorism. The UK must work with our friends in India to tackle terrorist threats and engage with India, Pakistan and key… pic.twitter.com/8RXezaJHx0
— Priti Patel MP (@pritipatel) May 7, 2025
credit : social media
ब्रिटनने भारतासोबत उभे राहावे – स्पष्ट मागणी
आपल्या भाषणादरम्यान, प्रीती पटेल यांनी ब्रिटिश सरकारकडे थेट विचारणा केली. “आपल्या गुप्तचर संस्था भारताच्या संपर्कात आहेत का? पहलगाम हल्ल्याच्या तपासात आपण सहकार्य करत आहोत का?” त्यांनी स्पष्टपणे मागणी केली की ब्रिटनने भारताला फक्त नैतिक नाही, तर थेट आणि सक्रिय पाठिंबा द्यावा, ज्यामुळे जागतिक स्तरावरील दहशतवादविरोधी लढा अधिक प्रभावी होईल.
लष्कर-ए-तोयबाचे घातक रूप
हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर प्रीती पटेल यांनी लष्कर-ए-तोयबा या संघटनेच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी विचारले की, ब्रिटिश सरकार या हल्ल्यामागे लष्कर-ए-तोयबाचा हात असल्याचे मान्य करते का? तसेच, या संघटनेचे हमासशी असलेले कथित संबंध ब्रिटन सरकारच्या माहितीत आहेत का, याचीही चौकशी केली. त्यांच्या मते, दहशतवादाविरोधातील लढाई केवळ राजनैतिक नाही, तर लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्याचा लढा आहे, आणि यामध्ये पश्चिमी राष्ट्रांनी भारतासोबत खांद्याला खांदा लावून उभे राहणे आवश्यक आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारत-पाकिस्तान संघर्षामुळे जागतिक स्तरावर संभ्रम; आरोप प्रत्यारोपात कोण बरोबर कोण चूक?
भारताची दहशतवादविरोधी भूमिका जागतिक स्तरावर सन्मानित
भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, दहशतवाद्यांविरुद्ध कारवाईसाठी तो कोणत्याही टप्प्यावर माघार घेणार नाही. ब्रिटिश संसदेमध्ये प्रीती पटेल यांच्यासारख्या प्रभावी नेत्यांनी या कारवाईला पाठिंबा देऊन भारताच्या भूमिकेला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून दिली आहे. पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यांविरुद्ध कठोर भूमिका घेण्याची आता वेळ आली आहे, हा स्पष्ट संदेश लंडनपासून इस्लामाबादपर्यंत झणझणीतपणे पोहोचलेला दिसतो.