फोटो सौजन्य: सोशल मीडिया
बीजिंग: अमेरिका आणि चीन यांच्यातील संबंध पुन्हा एकदा तैवानच्या मुद्द्यावरुन बिघडले आहेत. चीनने तैवानला अमेरिकेने दिलेल्या संरक्षण सहाय्य पॅकेजचा विरोध केला आहे. चीनने म्हटले आहे की, हे करताना अमेरिका आगीश खेळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेने नुकतेच तैवीनसाठी 4.85 हजार कोटी रुपयांची संरक्षण पॅकेडची घोषणा केली होती. यामुळे चीनने तीव्र संताप व्यक्त केला आहे. अमेरिकेने चीनच्या वन चायना पॉलिसीचे उल्लंघन केल्याचे चीनने म्हटले आहे.
तैवान रेड लाईन आहे- चीन
याशिवाय, अमेरिकेने दोन दिवसांपूर्वी संरक्षण विभागाकडून तैवानसाठी 2.50 हजार कोटी रुपयांच्या लष्करी विक्रीलाही मंजुरी दिली आहे. यावर चीनच्या परारष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, या कृचीने अमेरिकेने वन चायना पॉलिसीचे उल्लंघन केले आहे. मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, तीन आपल्या सार्वभौमत्वाचे आणि प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलेल. याशिवाय चीनने तैवानला रेड लाईन असल्याचे स्पष्ट केले आहे.
शांततेला धोका
चीनने अमेरिकेला तैवानला शस्त्रे पुरवण्याचे थांबवण्याचे आवाहन केले आहे. चीनच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेच्या या कृतीमुळे या प्रदेशातील स्थैर्य व शांतता धोक्यात येऊ शकते. चीनी स्टेट काउंसिलच्या प्रवक्त्या झू फेंगलियान यांनीही अमेरिकेच्या या कृतीचा तीव्र विरोध केला आहे.तर दुसऱ्या बाजूला, तैवानने अमेरिकेच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. तैवानच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोशल मीडियावर अमेरिकेचे आभार मानत म्हटले की, हा निर्णय तैवानच्या सुरक्षेसाठी अमेरिकेची वचनबद्धता दर्शवतो.
वन चायना पॉलिसी म्हणजे काय?
चीनच्या मते, जगात एकच चीन आहे, आणि तैवान हा चीनचाच अविभाज्य भाग आहे. चीन तैवानला स्वतंत्र देश मानणाऱ्या किंवा त्याच्याशी संबंध ठेवणाऱ्या देशांचा विरोध करतो. भारतासह अनेक देश “वन चायना पॉलिसी”चे समर्थन करतात.
अमेरिका-चीन तणावातील तैवान महत्त्वाचा मुद्दा
अमेरिकेने 1979 मध्ये चीनसोबत संबंध सुधारले आणि तैवानसोबतच्या राजनैतिक संबंधांना समाप्ती दिली. तरीही, अमेरिकेने चीनच्या विरोधाला डावलून तैवानला शस्त्रे पुरवली आहेत. अमेरिकेनेही “वन चायना पॉलिसी”ला समर्थन दिले आहे, पण तैवानच्या मुद्द्यावर त्याची भूमिका साशंक राहिली आहे.
चीनचा तैवानवर कब्जा करण्याचा प्रयत्न
1940 च्या दशकात चीनमध्ये कम्युनिस्ट राजवट आल्यावर राष्ट्रवादी तैवानमध्ये गेले आणि तिथे लोकशाही सरकार स्थापन केले. चीन तैवानला स्वतःचा भाग मानतो, तर तैवान स्वतःला स्वतंत्र देश समजतो. चीन तैवानच्या हवाई सीमांमध्ये सातत्याने घुसखोरी करत असून, अमेरिकन नौदलाच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी सैन्य तैनात करत आहे.