मित्रच बनला शत्रू! चीनने तुर्कीविरोधात रचाला मोठा डाव; एर्दोगानला संपवण्यासाठी तैनात केले जासूस (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
बिजिंग: चीन हा तुर्कीचा लष्करी भागीदार आणि चांगला मित्र आहे. परंतु चांगल्या मित्रानेच तुर्कीच्या पाठित खंजीर खुपसला आहे. एक मोठी माहिती समोर आली आहे. चीन तुर्कीविरोधात मोठा डाव रचत असल्याचे म्हटले जात आहे. तुर्कीच्या राष्ट्रीय गुप्तचर संघनने याबाबत मोठा खुलासा केला आहे. तुर्कीच्या गुप्तचर संघटनेने दिलेल्या माहितीनुसर, चिनीने तर्कीमध्ये जासूस तैनात केले आहे. चीनी जासूसांच्या मदतीन बिजिंगच्या सायबर हेरगिरी रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे.
ही हेरागिरी सरकारी अधिकारी आणि तुर्कीतील उइगर मुस्लीमांविरोधात करण्यात आली आहे. चीननच्या हेरांनी घोस्ट बेस स्टेशन म्हणजे मोबाईल टॉवरच्या माध्यमातून हेरगिरीचे काम केले आहे. तुर्कीच्या गुप्तचर संस्थेने या हेरांना रंगेहाथ पकडले आहे.
तुर्कीच्या राष्ट्रीय गुप्तचर संस्थेला चीनमदून काही संशयित हालचालींबद्दल संशय आला होता. यामुळे गुप्तचर संस्थेने यासंबंधी तपास सुरु केला. संस्तेला तपासात सात चिनी नागरिक गुप्तपने घोस्ट बेस स्टेशनच्या मदतीने तुर्कीमध्ये सायबर जाळे तयार करत असल्याची माहिती मिळाली. या टेक्निकच्या मदतीने हेर लोकांच्या मोबाईलमधील चॅट, लोकेशन आणि वैक्तिक माहिती चोरत होते.
तुर्कीच्या गुप्तचर संस्थेला तापासात आणखी काही धक्कादायक माहिती समोर आली. चीनच्या जासूसांनी हेरगिरीची उपकरणे एकदम तुर्कीमध्ये आणणे अडचणीचे असल्याने त्यांची छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये तस्करी केली. चार लोकांच्या मदतीने, ॲंटेना, बॅटरी, आणि इतर काही भाग तुर्कीमध्ये आणण्या,त आले. तसेच चीनचे हे जाळे इस्तंबूलपासून, इझमीर, मनिसा, बालिकेसिर आणि बुर्सा पर्यंत पसरलेले आहे. गुप्तचर संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, तापासामध्ये काही चिनी जासूसांना अटक देखील करण्यात आली आहे.
मोबाईल नेटवर्ख कंपन्यांकडे अनेक ग्राहकांनी सरकारी संस्था किंवा कंपन्यांच्या नावाने बनावट एसएमएस येत असल्याची तक्रार केली. मोठ्या प्रमाणात तक्राराच्या नोंदी आल्यामुळे प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली. चैकशी दरम्यान गुप्ततचर संस्थेला बनावट एसएमएस मोबाईल टॉवरच्या मदतीने येत असल्याचे आढळून आले.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, जाजूस तीन गटांमध्ये बिभागून काम करत होते. यामध्ये एक गट एसएमएस पाठवण्याचे काम करत होता. एक गट डेटा इंटरसेप्ट करण्याचे आणि एक गट सर्व डेटा चीनमधील सर्व्हरवर पाठवण्याचे काम करत होता. नंतर विदेशी ॲपच्या मदतीने लोकांना टार्गेट केले जात होते. लोकांचे क्रेडिट कार्डची माहिती गोळा केली जात होती