CPJ Report: २०२४ हे वर्ष पत्रकारांसाठी होते सर्वात प्राणघातक, भारतापासून पाकिस्तानपर्यंत झाल्या 'इतक्या' हत्या ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
CPJ Report : २०२४ हे वर्ष पत्रकारांसाठी सर्वात रक्तरंजित वर्ष ठरले आहे. सीपीजेने जारी केलेल्या अहवालात असे म्हटले आहे की गेल्या वर्षी संघर्षांमध्ये किमान १२४ पत्रकार मारले गेले होते, त्यापैकी ७५ टक्के पत्रकार केवळ इस्रायली हल्ल्यांमध्ये मारले गेले. सीपीजेच्या मते, २०२३ च्या तुलनेत २०१४ मध्ये पत्रकारांची हत्या २२ टक्के जास्त झाली, ही आकडेवारी जगभरातील आंतरराष्ट्रीय संघर्ष, राजकीय अशांतता आणि गुन्हेगारीच्या वाढत्या पातळीचे प्रतिबिंब आहे. सीपीजे गेल्या ३० वर्षांपासून पत्रकारांविरुद्धच्या घटनांचा डेटा गोळा करत आहे आणि हे वर्ष सर्वात प्राणघातक ठरले आहे. सीपीजेच्या अहवालात असे म्हटले आहे की १८ देशांमध्ये पत्रकार आणि माध्यम कर्मचाऱ्यांची हत्या झाली आहे.
सीपीजे गेल्या ३० वर्षांपासून पत्रकारांविरुद्धच्या घटनांचा डेटा गोळा करत आहे आणि हे वर्ष सर्वात प्राणघातक ठरले आहे. सीपीजेच्या अहवालात असे म्हटले आहे की १८ देशांमध्ये पत्रकार आणि माध्यम कर्मचाऱ्यांची हत्या झाली आहे. सीपीजेच्या मते, गाझा युद्धात एकूण ८५ पत्रकार मारले गेले आणि ते सर्व इस्रायली सैन्याच्या गोळीबारात मारले गेले, तसेच ८५ पैकी ८२ मीडिया कर्मचारी पॅलेस्टिनी होते असेही म्हटले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘आम्ही भारताला गुलाम बनवले आणि…’ UK मध्ये भारतीय महिलेवर अत्याचार करून केली वांशिक टिप्पणी, वाचा संपूर्ण प्रकरण
सुदान आणि पाकिस्तानमध्येही पत्रकारांची हत्या झाली
पत्रकार आणि माध्यम कर्मचाऱ्यांच्या हत्येच्या संख्येत सुदान आणि पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर आहेत, जिथे प्रत्येकी सहा पत्रकार आणि माध्यम कर्मचाऱ्यांची हत्या झाली आहे. त्यानंतर, पत्रकारांसाठी सर्वात धोकादायक देशांपैकी एक मानल्या जाणाऱ्या मेक्सिकोमध्ये पाच पत्रकारांची हत्या करण्यात आली आहे. त्याच वेळी, हिंसाचारग्रस्त देश हैतीमध्ये दोन पत्रकारांचीही हत्या झाली आहे. याशिवाय, अहवालात म्यानमार, मोझांबिक, भारत आणि इराकमध्ये इतर मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे आणि २०२४ हे वर्ष पत्रकारांसाठी सर्वात धोकादायक असल्याचे वर्णन करण्यात आले आहे.
2024 was the deadliest year for journalists in CPJ’s history.
Every journalist killed is the loss of a truth-teller. Those who chronicle our reality and hold power to account deserve justice. We will not stop seeking it.
Read more in CPJ’s new #2024KilledReport:… pic.twitter.com/a9KIbEZgO1
— Committee to Protect Journalists (@pressfreedom) February 12, 2025
credit : social media
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : रमजानमध्ये इराणवर कोसळणार संकटांचा डोंगर? इस्रायलने तयार केली विनाशाची योजना
२०२५ मध्येही पत्रकार सुरक्षित नाहीत
सीपीजे १९९२ पासून पत्रकारांच्या मृत्यूंचे निरीक्षण करत आहे आणि २०२४ च्या त्यांच्या अहवालात असे आढळून आले की २४ पत्रकारांना त्यांच्या कामामुळे जाणूनबुजून मारण्यात आले. अहवालात असेही म्हटले आहे की संसाधनांच्या कमतरतेमुळे फ्रीलांसर सर्वात असुरक्षित आहेत, २०२४ मध्ये ४३ मृत्यू झाले. सीपीजेच्या मते, २०२५ हे नवीन वर्ष माध्यम कर्मचाऱ्यांसाठी फारसे चांगले दिसत नाही, कारण गेल्या आठवड्यातच ६ पत्रकारांची हत्या झाली आहे.