Trump Warns Iran : 'जगाचा नकाशावरुन पुसून टाकीन', युद्धनौकेवरील हल्ल्यानंतर ट्रम्प आक्रमक; इराणला महाभयंकर इशारा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोमवारी (०४ मे) रोजी इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने होर्मुझमध्ये एका अमेरिकी युद्धनौकेवर हल्ल्याची माहिती दिली. जास्क बंदराच्या शहराजवळ अमेरिकी युद्धनौकेने आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप इराणने केला आहे. यामुळे इशारा देऊनही जहाजाने मार्ग बदलला नाही, परिणामी त्यांना लष्करी कारवाईला सामोरे जावे लागले असे इराणने म्हटले.
मात्र, या हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी आक्रमक भूमिका घेत इराण(Iran) ला कडक शब्दात इशारा दिला. फॉक्स न्यूजला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी म्हटले, जर इराणने अमेरिकी जहाजांना लक्ष्य केल, तर त्यांचे नाव जगाच्या नकाशावरुन पुसून टाकण्यात येईल. त्यांच्या या विधानाने पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे.
हा वाद अशा वेळी पेटला आहे, जेव्हा अमेरिकेने ०३ मे रोजी प्रोजेक्ट फ्रीडमची घोषणा केली आहे. याचा उद्देश होर्मुझमध्ये अडकलेल्या सर्व जहाजांना सुरक्षित बाहेर काढणे आहे. २८ फेब्रुवारी रोजी इराणसोबतच्या युद्धामुळे होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाली होती. यामुळे येथे २००० हून अधिक व्यापारी जहाजे अडकली आहेत.
या मोहिमेअंतर्गतच अमेरिकन नौदलाच्या सुरक्षेत एक व्यापारी जहाजा येथून प्रवास करत होते. याच ताफ्यावर हल्ला झाल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. अमेरिकेच्या प्रोजेक्ट फ्रीडम मोहिमेला इराणने तीव्र विरोध केला असून हा हल्ला करण्यात आला असल्याचे ट्रम्प यांचे मत आहे.
सध्या या इशाऱ्यामुळे आखाती देशातील परिस्थिती अत्यंत स्फोटक बनली आहे. हा वाद केवळ अमेरिका इराणपर्यंत मर्यादित राहिलेला नसून जागतिक संघर्षाचे रुप धारण करत आहे. यामध्ये मध्यपूर्वेतील अरब देशही ओढले गेले आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधन दर गगनाला भिडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या दोन महिन्यापासून हा वाद सुरु असल्याने तीव्र चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. वाद आणखी पेटल्यास जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो.
Ans: होर्मुझमध्ये युद्धनौकेवरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी आक्रमक इशारा इराणला दिला आहे. इराणला जगाच्या नकाशवारुन पुसून टाकण्याची धमकी त्यांनी दिली आहे.
Ans: या वाढत्या तणावामुळे पश्चिम आशियात पुन्हा युद्ध सुरु होण्याची चिन्हे दिसत आहेत. यामुळे जागतिक बाजारपेठेत पुन्हा तेल आणि उर्जा पुरवठ्यावर परिणाम होईल. परिणामी किमतींमध्ये अस्थिरता निर्माण होऊ शकते.






