वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ट्वीट करुन प्रतिक्रिया (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नवी दिल्ली: अलीकडे भारत-बांगलादेश संबंध अधिकच बिघडत चालले आहेत. दरम्यान बांगलादेश पुन्हा एखदा भारतावर संतापला आहे. काल 1971 च्या युद्धाची आठवण करुन देणारा विजय दिवस होता. या दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टवर बांगलादेशाचे कायदेशीर सल्लागार आसिफ नजरुल यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी म्हटले आहे की, 16 डिसेंबर हा फक्त बांगलादेशाचा विजय दिवस असून भारत केवळ त्या विजयात मित्र होता.
आसिफ नजरुल यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टवर लिहिले की, 16 डिसेंबर 1971 हा बांगलादेशाचा विजय दिवस होता, भारत केवळ भागीदार होता, त्याहून अधिका काही नाही. बांगलादेशाच्या या आक्षेपामुळे दोन्ही देशांमधील संबंध आणखीनच चिघळले आहेत. तसेच बांगलादेश पाकिस्तानशी संबंध दृढ करण्यचा प्रयत्न करत असताना हा तणाव वाढत चालला आहे.
नरेंद्र मोदींची विजय दिवस पोस्ट
Today, on Vijay Diwas, we honour the courage and sacrifices of the brave soldiers who contributed to India’s historic victory in 1971. Their selfless dedication and unwavering resolve safeguarded our nation and brought glory to us. This day is a tribute to their extraordinary…
— Narendra Modi (@narendramodi) December 16, 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल 16 डिसेंबर रोजी विजय दिनानिमित्त एक्सवर पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, “आज विजय दिवसाच्या दिवशी आम्ही त्या शूर सेैनिकांच्या धैर्याचा आणि बलिदानाचा सन्मान करतो. त्यांनी 1971 च्या युद्ध विजयात भारताने महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांचे निस्वार्थ समर्पण आणि अटल संकल्प हा आजचा दिवस आहे. तसेच त्यांचे शौर्य आणि दृढ भावनेला श्रद्धांजली अर्पण करतो. याचा आम्हाला अभिमान आहे.” ही पोस्ट भारतीय जवानांच्या शौर्याची आणि त्यांच्या बलिदानाची आपल्याला आठवण करुन देते.
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार विक्रम मिसरी यांची बांगलादेशला भेट
काही दिवसांपूर्वी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार विक्रम मिसरी यांनी बांगलादेशला भेट दिली होती. या भेटीदरम्यान त्यांनी बांगलादेश अंतरिम सरकारने भारतासह सर्व देशांशी समानतेच्या आणि परस्पर आदरावर आधारित संबंध प्रस्थापित करावेत असे म्हटले होते. विक्रम मिसरींच्या या इच्छेवर बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे परराष्ट्र सल्लागार मोहम्मद तौहीद हुसैन यांनी बांगलादेशची सहमती दर्शवली होती. मात्र, बांगलादेशाच्या नरेंद्र मोदींच्या विजय दिवस पोस्टवरील आक्षेपामुळे विवाद निर्माण झाला आहे.
भारत बांगलादेश संबंध बिघडले
अकीलकडे बांगलादेशाने भारतविरोधी अनेक पावले उचलली आहेत. तसेच 1971 च्या युद्धात भारताने महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र, ही ऐतिहासिक गोष्ट बांगलादेश विसरत चालला असल्याचे म्हटले जात आहे. पाकिस्तानच्या अत्याचारापासून स्वातंत्र्य याच काळात बांगलादेशला मिळाले होते. या परिस्थितीमुळे भारत-बांगलादेश संबंधांमध्ये तणाव वाढू शकतो असे तज्ञांनी म्हटले आहे.