Hormuz War : होर्मुझमध्ये अमेरिकेचा गेम ओव्हर? इराणच्या 'मॉस्किटो फ्लीट' रणनीतीची जोरदार चर्चा, काय आहे नेमका प्लॅन? (फोटो सौजन्य: एआय जनरेटेड)
तज्ज्ञांच्या मते, इराणचे हे यश कोणत्याही मोठ्या नौदलाच्या ताफ्यामुळे नसून त्यांच्या पारंपरिक मच्छर ताफ्यामुळे (मॉस्किटो फ्लीट) आहे. ड्रोन आणि किनारपट्टीवरील क्षेपणास्त्रांच्या मदतीने हजारो लहान पण वेगवान बोटींनी बनलेली तेहरानची ही ‘स्वॉन स्ट्रॅटेजी’ स्वतःच्या पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान होऊनही जागतिक बाजारपेठेला हादरवून सोडण्यास सक्षम ठरली आहे. या ताफ्यात हजारो लहान बोटींचा समावेश असून त्या ताशी ४० ते ६० समुद्री मैल वेगाने धावू शकतात.
गुप्तचर अहवालानुसार इराण (Iran) ‘थवा’ किंवा ‘झुंड रणनीतीचा वापर करतो, ज्यामध्ये १० ते १५ वेगवान बोटी मिळून एका विशाल
टैंकरला सर्व बाजूंनी घेरतात. टँकरवरील सुरक्षा पथक कदाचित एक-दोन बोटीना रोखू शकेल.
पारंपरिक युद्धनौकांच्या उलट या बोटी रडारचर पकडणे कठीण असते, त्यांना इराणच्या समुद्रकिनाऱ्यावरील खडकांमागे लपवणे सोपे असते आणि या बोटी इतक्या स्वस्त असतात की एखादी बोट नष्ट झाली तरी इराणचे कोणतेही धोरणात्मक नुकसान होत नाही. या बोटी पूर्णपणे मार्ग बंद न करताही जहाजांच्या वाहतुकीत मोठा अडथळा निर्माण करतात. अशा मोहिमामध्ये या बोटी अचानक व्यापारी जहाजांच्या मार्गात शिरतात, १०-२० मिनिटे टँकरवर हल्ला करतात.
आयआरजीसी मॉस्किटो फ्लीट – विरुद्ध पारंपारिक नौदल युद्धनौका
| वैशिष्ट्ये | मॉस्किटो फ्लीट | नौदल कार्वेट/फ्रिगेट |
|---|---|---|
| कमाल वेग | ११५+ मैल/तास | ३०-३५ मैल/तास |
| मुख्य शस्त्रास्त्रे | मशीन गन, खांद्यावरून डागता येणारी क्षेपणास्त्रे, कामिकाझे ड्रोन | ड तोफा, टॉरपीडो, पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे |
| युद्ध रणनीती | थवा रणनीती | आमने-सामनेची लढाई |
| ओळख | रडारवर पकडणे कठीण | आकारामुळे सहज ओळखता येते |
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.
Ans: इराणच्या मॉस्किटो फ्लीट रणनीतीमध्ये हजारो लहान वेगवान बोटींचा सामवेश आहे. या बोटी, ड्रोन, क्षेपणास्त्रे आणि मशीनगनने सज्ज असून थवा रणनीतीने हल्ला करतात.
Ans: होर्मुझचा मार्ग हा जगातील सर्वात महत्त्वाच्या तेल वाहतूक मार्गापैकी एक आहे. या मार्गावरुन जागतिक तेल पुरवठ्या २० टक्के हिस्सा नेण्यात येतो. या मार्गावर तणाव वाढल्यास जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो.
Ans: या रणनीतीत अनेक लहान बोटी एकत्र येऊन मोठ्या जहाजाला घेरतात. जहाजाच्या रडारला चकवा देत अचानक हल्ला करुन वाहतुकीत अडथळा निर्माण करतात.






