(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
पीपीएफचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्याला मिळणारी शासकीय हमी. याचा अर्थ तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि मिळणारा परतावा पूर्णपणे Tax-Free असतो. जेव्हा तुम्ही तुमचे खाते मुदतीपूर्वी बंद करता, तेव्हा तुम्ही हा दीर्घकालीन करमुक्त चक्रवाढीचा म्हणजेच टॅक्स-फ्री कंपाउंडिंगचा लाभ कायमचा गमावून बसता.
पीपीएफचा एकूण कालावधी १५ वर्षांचा असतो. पण जर गंभीर आजार किंवा उच्च शिक्षणाच्या गरजा यांसारख्या विशेष परिस्थितीत सरकार ५ वर्षांनंतर खाते बंद करण्याची परवानगी देते. मात्र, असे केल्यास त्यासाठी मोठा खर्च येतो. नियमांनुसार, जर तुम्ही तुमचे खाते मुदतीपूर्वी बंद केलत, तर खाते उघडल्याच्या तारखेपासून ते बंद करण्याच्या तारखेपर्यंत मिळालेल्या व्याजातून १% कपात केली जाते.
जर तुम्हाला ७.१% व्याज मिळत असेल, तर मुदतपूर्व पैसे काढल्यास त्यावर फक्त ६.१% व्याज आकारले जाईल. ही १% कपात कमी वाटू शकते, पण यामुळे १०-१२ वर्षांत जमा झालेल्या निधीवर लाखो रुपयांचे नुकसान होऊ शकते. शिवाय, तुम्ही भविष्यातील चक्रवाढ व्याजालाही मुकता. म्हणून, अत्यंत आवश्यक असेल तरच तुमचे पीपीएफ खाते १५ वर्षांच्या आत बंद करा. अन्यथा तुम्हाला मोठा झटका बसणार इतकं मात्र नक्की.






