अमेरिका-इस्रायलचे बॉम्ब हल्ले अयशस्वी झाले का? इराणने ढिगाऱ्याखालून १,००० प्राणघातक क्षेपणास्त्रे हस्तगत केली असून, ते युद्धासाठी सज्ज आहेत. ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Iran recovery of 1000 missiles CNN : मध्य-पूर्वेतील (Middle East) युद्धाच्या आगीत एक अत्यंत खळबळजनक आणि धक्कादायक वळण समोर आले आहे. अमेरिका आणि इस्रायलने मिळून इराणची लष्करी कंबर तोडण्यासाठी ४० दिवसांत तब्बल १३,५०० हून अधिक बॉम्ब हल्ले केले होते. इराणचे क्षेपणास्त्र तळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचा दावा पाश्चात्त्य माध्यमांकडून केला जात होता. परंतु, आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था ‘CNN’ ने प्रसिद्ध केलेल्या ताज्या रिपोर्टने अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाला म्हणजेच पेंटागॉनला मोठा धक्का दिला आहे. इराणने कोणत्याही हाय-टेक तंत्रज्ञानाचा वापर न करता, केवळ साध्या बुलडोझर आणि डंप ट्रकच्या मदतीने आपले उद्ध्वस्त झालेले बोगदे पुन्हा खोदून काढले आहेत आणि ढिगाऱ्याखालून १,००० हून अधिक प्राणघातक क्षेपणास्त्रे सुरक्षितपणे जप्त केली आहेत.
हॅम्बर्ग विद्यापीठातील ‘शांतता संशोधन आणि सुरक्षा धोरण संस्थेचे’ वरिष्ठ संशोधक तिमूर कादिशेव, जे गेल्या अनेक वर्षांपासून इराणी लष्करी क्षेपणास्त्रांचा सखोल अभ्यास करत आहेत, त्यांनी सीएनएनशी बोलताना एक महत्त्वाचा खुलासा केला. ते म्हणाले, “इराण आजच्या युद्धाची तयारी काल-परवापासून करत नव्हता, तर ते गेल्या २० वर्षांपासून अशा प्रकारच्या संभाव्य महायुद्धाच्या तयारीमध्ये होते.” अमेरिकेने इराणचे बोगदे ढिगाऱ्यात बदलण्यासाठी अब्जावधी डॉलर्सची अत्यंत अत्याधुनिक आणि महागडी शस्त्रे वापरली. मात्र, इराणने तो ढिगारा साफ करण्यासाठी अत्यंत साधे आणि स्वस्त तंत्रज्ञान म्हणजेच बुलडोझर वापरले. हा अमेरिकेच्या युद्धनीतीला मिळालेला मोठा शह मानला जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : War Update: कुवेत बनले रणांगण! अमेरिकेचा इराणच्या 2 बेटांवर भीषण बॉम्बहल्ला; रडार यंत्रणा उद्ध्वस्त, पाच सैनिक जखमी, तणाव शिगेला
https://t.co/QiFdWCGH5A
⚠️ Scoop: @CNN analysis of satellite images published today: Iran has reopened 50 of the 69 tunnel entrances struck by the U.S. and Israel at 18 underground missile facilities. At the Dezful base, four of five entrances were reopened by May 12. At the… pic.twitter.com/WofpVkZcMW — The Tectonic (@thetect0nic) May 31, 2026
credit – social media and Twitter
‘न्यूयॉर्क टाइम्स’ने देखील अमेरिकन गुप्तचर संस्थांच्या हवाल्याने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, शस्त्रसंधीच्या (Ceasefire) काळात इराणने आपल्या नुकसानीची भरपाई अत्यंत वेगाने केली आहे. अमेरिकेचा आता असा विश्वास आहे की, इराणच्या एकूण भूमिगत क्षेपणास्त्र सुविधांपैकी तब्बल ९०% सुविधा आता किमान अंशतः कार्यरत झाल्या आहेत. इराणकडे असलेले भूमिगत क्षेपणास्त्र साठे इतके खोल आणि सुरक्षित आहेत की थेट हवाई हल्ल्यांमुळे त्यांचे नुकसान करणे अशक्यप्राय आहे. सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे, इराणकडे आजही त्यांचे मोबाईल मिसाईल लाँचर्स (Mobile Launchers) ७०% सुरक्षित आहेत, ज्यांच्या माध्यमातून ते कोणत्याही क्षणी इस्रायल आणि आखातातील अमेरिकन तळांवर नव्याने क्षेपणास्त्रांचा पाऊस पाडू शकतात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Crude Oil Prices: पेट्रोल होणार आणखी महाग! इस्रायलच्या एका निर्णयामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत 2 टक्क्यांनी वाढ; लेबनॉनमध्ये युद्ध
एका अज्ञात अमेरिकन अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, इराणने या युद्धातून स्वतःला सावरले आहे. इराणचे बहुतेक क्षेपणास्त्र तळ आता पूर्ण क्षमतेने काम करण्यासाठी सज्ज झाले आहेत. यामुळे इस्रायल आणि इतर मध्य-पूर्वेकडील देशांमधील तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचला आहे. इराणने ज्या पद्धतीने ढिगाऱ्याखालून आपली अस्त्रे बाहेर काढली आहेत, त्यावरून ते कोणत्याही आंतरराष्ट्रीय दबावापुढे झुकण्यास तयार नाहीत हे स्पष्ट होते. यामुळे आगामी काळात मध्य-पूर्वेमध्ये पुन्हा एकदा मोठ्या आणि अधिक विनाशकारी युद्धाचा भडका उडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.






