US Iran Ceasefire वरून गोंधळ! पाकिस्तानच्या मध्यस्थीवर UAE संतापला ; 'फसवणुकीचा' गंभीर आरोप (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
पाकिस्तान(Pakistan)ने अमेरिका आणि इराणमध्ये मेसेंजर म्हणून कार्य केले आहे. मात्र यावर अरब देश युएईने संताप व्यक्त केला आहे. शेजारी राष्ट्र आणि मित्र असूनही पाकिस्तानने यूएईला विश्वासात न घेतल्याने नाराजी व्यक्त केली आहे. यूएईच्या मते, पाकिस्तानने केवळ स्वतच्या स्वार्थासाठी आणि अमेरिकेच्या इशाऱ्यावर डील केली असल्याचे म्हटले. यामध्ये यूएई आणि इतर अरब देशांच्या हितसंबंधांना दुर्लक्षित करण्यात आले असल्याचे म्हटले आहे. युएईच्या मते, युद्धात सर्वात जास्त नुकसान हे युएईने सोसले आहे. यामुळे त्यांना शांतता प्रक्रियेतून बाहेर ठेवणे हा त्यांचा मोठा राजनैतिक अपमान आहे.
युद्धविराम झाला असला तरी युएईला इराणच्या संभाव्य हल्ल्यांची चिंता सतावत आहे. इराणने युद्ध सुरु झाल्यापासून यूएईवर २००० हून अधिक ड्रोन, ५०० बॅलेस्टिक मिसाइल्स आणि २६ क्रूझ क्षेपणास्त्रांचा मारा केला होता. यामध्ये दुबई, शारजाह आणि अबू धाबी यांसारख्या प्रमुख शहरांना लक्ष्य करण्यात आले. यामध्ये १० नागरिकांचाही मृत्यू झाला. सध्या युद्धविरामाच्या अटींमुळे भविष्यात इराण पुन्हा हल्ला करणार नाही याची कोणत्याही प्रकारची हमी नाही. कारण इराणच्या सर्व अटी या एकतर्फी आहेत.
शिवाय इराणने अटींमध्ये स्ट्रेट ऑफ होर्मुझ(Strait of Hormuz) वर त्यांचे नियंत्रण राहावे अशी मागणी केली आहे. ही मागणी मान्य केल्यास सर्वात मोठा धक्का युएई, सौदीस, कतार, कुवैत यांसारख्या अरब देशांना बसणार आहे. कारण इराण या मार्गावरुन जाणाऱ्या जहाजांकडून टोल वसूल करण्याची शक्यता आहे. मात्र पाकिस्तानने आधीच मध्यस्थी करुन यातून स्वतला सुरक्षित करुन घेतले आहे. शिवाय इराण आणि यूएईमधील १९०५ सुरु असलेला बेटांवरील वादामुळे गंभीर चिंता निर्माण झाली आहे.






