इराणमध्ये इस्लामिक राजवट संपुष्टात येणार? माजी राजाच्या मुलाने नागरिकांना पुढे येण्याचे केले आवाहन (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
तेहरान: मध्य पूर्वेत इराण आणि इस्रायलमध्ये सध्या तीव्र संघर्ष पेटला आहे.याच तणावादरम्यान इराणच्या माजी राजाच्या मुलाने रझा शाह पहलवी यांनी खळबळजनक विधान केले आहे. माजी राजा रझा शाह पहलवी यांच्या मुलाने इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ली खामेनी यांच्याविरोधात भाष्य केले आहे. त्यांनी इराणमध्ये लवकरच इस्लामिक राजवट संपुष्टात येईल असा दावा केला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
रझा शाह पहलवी यांनी आणि त्यांच्या घराण्याने खामेनी सरकारविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. १९७९ मध्ये इस्लामिक क्रांती स्थापन होण्यापूर्वी माजी राजा रझा शाह पहलवी यांनी इराणवर राज्य केले होते. त्यांनी नेहमीच इराणला धर्मनिरपेक्ष आणि पाश्चात्य सुसंस्कृत राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न केला. पंरुत १९७९ मध्ये त्यांची सत्ता उलटवून टाकण्यात आली आणि इस्लामिक राज्य स्थापन झाले.
रजा शाह पहलवी यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या एक मुलाखतीत इराणध्ये सत्ता परिवर्तनाची वेळ आली असल्याचे म्हटले. त्यांनी म्हटले की, आता वेळ आहे. ही लढाई इराणी नागरिकांची आहे खामेनीईंची नाही. या संघर्षाचा परिणाम सरकारला कमकुवत करेल. त्यांनी सांगितले की, गेल्या ४० वर्षापासून इराणमध्ये इस्लामिक राजवट आहे, यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागल आहे. परंतु आता लोकशाही स्थापन करण्याची वेळ आहे आहे.
रजा शाह पहलवी यांनी सोशल मीडियावर एक संदेश जारी केला आहे. यामध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायला इराणमध्ये सरकार बदलण्याचे आवाहन केले आहे. शाह पहलवी यांनी, इस्रायली हल्ल्याचा उद्देश इराणी लोकांना हानी पोहचवण्याचा नाह, तर त्यांना असलेला धोका कमी करणे होता. त्यांनी स्पष्ट केले की, इस्रायली हल्ल्यांमुळे इराणी राजवट कमकुवत झाली तर देशातमध्ये सत्तापरिवर्तन करण्यास अडथळा येणार नाही. पहलवी यांनी अयातुल्ला खामेनी यांना इराणमधील संकटासाठी जबाबदार धरले आहे. त्यांच्या हट्टीपणाचे परिणाम नागरिकांना भोगावे लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पहलवी यांनी पुढे म्हटले की, देशात आशा आणि सकारात्मकचे नवीन युग सुरु करण्याची आता गरज आहे. हा बदल करण्यासाठी इराणी लोकांना पुढे येणे अत्यंत महत्त्वाचे आहे. इराणच्या सध्याच्या सरकारच्या सत्तापलटाची सध्या गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे. यामुळे पहलवी यांनी केवळ इराणच्या नागरिकांनाच नव्हे तर संपूर्ण जगाला इराणमध्ये सत्ता बदल घडवून आणण्याचे आवाहन केले आहे. यामुळे आण्विक धोके, दहशतवाद आणि अतिरेकपणा कमी होईल असे त्यांचे मत आहे.
पहलवी यांनी पुढे म्हटले की, गेल्या ४० वर्षापासून इराणमध्ये धार्मिक राजवट आहे. आता या धार्मिक राजवटीपासून इराणला मुक्त करण्याची वेळ आली आहे. त्यांनी इराणमध्ये लोकशाही प्रक्रियेअंतर्गत निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. यामुळे इराणमध्ये लोक त्यांचे नेतृत्व स्वतंत्रपण निवडू शकतील.