मलेशियात भीषण रस्ता अपघात; विद्यापीठाच्या बसला कारची धडक, १५ जणांचा मृत्यू (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
क्कालालंपूर : मलेशियात एक भीषण दुर्घटना घडली आहे. मलेशियाच्या पेराक येथे भीषण रस्ता अपघात झाला आहे. विद्यार्थांना घेऊन जाणाऱ्या एका बसची कारशी धडकी झाली. यामध्ये १५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिची समोर आली आहे. सोमवारी (९ जून) सकाळी ही घटना घडली. अपघातानंतर मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. प्राथमिक तपासात कारला धडकल्यानंतर बसचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला असल्याचे म्हटले आहे.
न्यूज एशिया चॅनलने दिलेल्या वृत्तानुसार, पेराकमधील पूर्व-पश्चिम महामार्गातवर ही घटना घडली. विद्यापीठीच्या बसची एमपीव्ही कारशी धडक झाली. बसमध्ये अनेक विद्यार्थी होते. पेराकचे पोलिस प्रमुखथ नूर हिस्याम नॉर्डिन यांनी, धडकेनंतर बसचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचे म्हटले आहे. तसेच अजून तपास सुरु असल्याचे म्हटले आहे.
अपघातात १५ विद्यार्थ्यांचा मृत्यू
या अपघातात सुलतान इद्रिस एज्युकेशन युनिव्हर्सिटीच्या १५ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. हुलू पेराक सिव्हिल डिफेनस फोर्सने दिलेल्या माहितीनुसार, आपत्ती केंद्रला या घटनेची माहिती दुपारी १.१० वाजता मिळाली. या नंतर आपत्ती विभाग आणि बचाव पथकाने त्वरित घटनास्थळी धाव घेतली. बसमध्ये ४८ लोक होते. यामध्ये १५ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
यामध्ये दोनजण गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णलायात उपचार सुरु आहेत. तसेच इतर लोकांचीही प्रकृती अद्याप सुधारलेली नाही. सहा जणांची प्रकृती स्थिर आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बस तेरेन्गानू राज्यातील जेटेर्हे येथून येत होती. यावेळी पेराकमधील जनजुगं मालीम विद्यापीठाच्या कॅम्पसकडे जात असताना हा भीषण अपघात झाला. या दुर्दैवी घटनेत १२ जणांचा जागीच मृत्यू झाला.
निवडणुका निष्पक्ष होणार? खालिदा जिया यांच्या BNP पक्षाचा मोहम्मद युनूस यांच्यावर गंभीर आरोप