US Visa News : ट्रम्प यांचे भारतासाठी रेड कार्पेट; 'लाडोबा' पाकिस्तानला मात्र दणका, ७५ देशांच्या व्हिसा यादीत केले समाविष्ट
H-1B Visa : ट्रम्पच्या कडक व्हिसा नियमांचा धसका; अमेरिकेत घरातच अडकले भारतीय
अमेरिकेच्या (America) परराष्ट्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, काही देशांमधून येणारे अर्जातील कागदपत्रे बनावटी आहेत. यामुळे फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत, तसेच देशातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. या यादीत अमेरिकेने रशिया, ब्राझील, थायलंड, सोमालिया, इराण, अफगाणिस्तान, नायजेरिया, इराक, इजिप्त, येमेन आणि पाकिस्तान, बांगलादेशचाही समावेश केला आहे. अमेरिकेने या देशांना हाय-रिस्क लिस्टमध्ये टाकले आहे.
सगळ्यात आश्चर्याची बाब म्हणजे यामध्ये पाकिस्तानचाही समावेश आहे. गेल्या वर्षातील पाकिस्तान (Pakistan) आणि अमेरिकेचे संबंध पाहता हा निर्णय शाहबाज सरकारसाठी धक्कादायक मानला जात आहे. गेल्या वर्षा पाकिस्तानने देशातील सापडलेल्या दुर्मिळ खनिजांच्या खाणीवरुन ट्रम्पकडून वाहवाह करुन घेतली होती. परंतु यामध्ये पाकिस्तानचाही समावेश असल्याने खळबळ उडाली आहे. यामागचे कारण म्हणजे पाकिस्तानची कागपत्र पडताळणी सिस्टिम अतिशय कमकुवत आहे, शिवाय गेल्या वर्षी सुरक्षा दलांवर झालेल्या हल्ल्यात एका पाकिस्तानी नागरिकाचा हात होता. यामुळे पाकिस्तानमधून फसवणुकीचा धोका असल्याचे म्हणत त्यालाही हाय-रिस्कच्या यादीत सामील करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे या हाय-रिस्क यादीतून भारताला वगळण्यात आले आहे. तज्ज्ञांच्या मते, यामागे भारताची मजबूत कागपत्रे पडताळणी प्रक्रिया, बायोमेट्रिक डेटा, अमेरिकेच्या इमिग्रेशन नियमांचे काटेकोर पालन ही कारणे आहेत. शिवाय यातून भारत अजूनही अमेरिकेचा विश्वासार्ह मित्र असल्याचे स्पष्ट होते. दोन्ही देशांच्या व्यापारात तणाव आला असला तरी संबंध गेल्या अनेक काळापासून मजबूत झालेले आहेत. तंत्रज्ञान आणि आर्थिक क्षेत्रातील सहकार्य आजही महत्त्वाचे आहे.
Ans: अमेरिकेने ७५ देशांसाठी स्थलांतरित आणि पर्यटक व्हिसा प्रक्रिया तात्पुरती थांबवली आहे.
Ans: भारताची मजबूत कादपत्र पडताळणी सिस्टम, अमेरिकेच्या इमिग्रेशन नियमांचे काटेकोर पालन, आणि दोन्ही देशातील विश्वासार्ह सहकार्ययामुळे भारताला अमेरिकेने या निर्णयातून वगळे आहे.
Ans: पाकिस्तानची कमकुवत कागपत्र पडताळणी, फसवणुकीचा धोका आणि अविश्वासार्हता यामुळे अमेरिकेला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. या अमेरिकेने पाकिस्तानी इमिग्रंच व्हिसा प्रक्रिया बंद केली आहे.
Ans: अमेरिकेने सध्या फक्त इमिग्रंट व्हिसा प्रक्रिया थांबवली आहे.






