पाकिस्तानमध्ये अराजकता! PoK मध्ये सरकारविरोधी पोलिस अधिकारी उतरले रस्त्यावर, कारण काय? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये सध्या मोठ्या गोंधळ उडाला आहे. पाकिस्तानच्या काश्मीरमध्ये सैनिकांनी सरकारविरोधात बंड पुकारला आहे. 80 हजार सैनिक सरकारविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. पीओकेची राजधानी मुझफ्रबादमध्ये शेकडो पोलिस कर्मचारी सरकारविरोधी बॅनर घेऊन रस्त्यावर उतरले आहेत. सरकारविरोधात अनिश्चित काळासाठी संप पुकारण्यात आला आहे. मंगळवारी (22 जुलै) सैनिकांशी चर्चा करुन उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. परंतु या बैठकीत कोणताही सकारात्मक निकाल लागाला नाही.
पीओकेमधील कर्मचाऱ्यांनी सरकारला मागण्या पूर्ण होईपर्यंत निदर्शनांची धमकी दिली आहे. २१ जुलैपासून हा संप सुरु करण्यात आला आहे. यामुळे पीओकेच्या सरकारची चिंता वाढत चालली आहे. मात्र हे सैनिक नेमके कोणत्या कारणावरुन बंड पुकारत आहेत?
सध्या या निदर्शनांनी तीव्र वळण घेतले आहे. पोलिस कर्मचारी, आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये रोष वाढत आहे. दरम्यान ३ जुलैपासून पूर्ण संपावर जाण्याचाही इशारा सरकारला देण्यात आला आहे.






