इराणमध्ये अजूनही अडकले हजारो भारतीय; कशी होणार सुटका? परराष्ट्र मंत्रालयाने सांगितला 'मास्टरप्लॅन' (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्त रणधीर जयस्वाल (Randhi Jaiswal) यांनी सांगितले की, इराण(Iran) मधील भारतीय दूतावास सातत्याने नागरिकांच्या संपर्कात आहे. विमानसेवा विस्कळीत झाली असल्याने भारत सरकरा पर्यायी मार्गांचा अवलंब करत आहेत. सध्या भारत सरकार शेजारी देशांच्या मदतीने जमिनीमार्ग आणले जाणार आहे. जयस्वाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, अझरबैजान आणि आर्मेनिया या देशांच्या सीमेपर्यंत इराणमधील नागरिकांना पोहोचवले जाईल. यानंतर या देशांमदून कमर्शियल फ्लाइट्सद्वारे भारतात परतण्यासाठी व्हिसा सपोर्ट आणि बॉर्डर क्लिअरन्समध्ये मदत करत आहे. तसेच तेहरानमधील भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांना आधीच सुरक्षित ठिकाण हलवण्यात आले आहे.
याचवेळी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांशी गेल्या काही दिवसांत सतत संपर्क साधला आहे. या चर्चेत भारतीयांच्या सुरक्षेवर आणि सागरी सुरक्षेवर चर्चा करण्यात आली. तसेच भारताच्या उर्जा सुरक्षेवरही गांभीर्याने विचारांची देवाण-घेवाण झाली. जयशंकर यांनी इराणला शांतता आणि संयम बाळगण्याचे आवाहन केले.
याच दरम्यान भारताने संयुक्त राष्ट्रात इराणविरोधी भूमिका घेतली आहे. इराण आखाती देशांवरील हल्ल्याविरोधात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत ठराव मांडण्यात आला होता. या ठरावाचे भारताने समर्थने केले आहे. एवढेच नव्हे तर को-स्पॉन्सर १३५ देशांमध्येही सहभागी झाला आहे. भारताने आपल्या नागरिकांच्या सुरक्षेला आणि प्रादेशिक स्थिरतेला प्राधान्य देण्याचे म्हटले आहे. याच वेळी भारताने संकटाकाळात आपल्या शेजारी देशांची साथ सोडली नसल्याचे स्पष्ट केले आहे. भारताने बांगलादेश, श्रीलंका, आणि मालदीवला पेट्रोलियम पुरवठा दिला आहे.
Weekly Media Briefing by the Official Spokesperson (March 12, 2026)
https://t.co/bbTF4ybitC — Randhir Jaiswal (@MEAIndia) March 12, 2026
इराणला मोठा झटका! रशिया-चीनने फिरवली पाठ? भारतानेही कंबर कसली, UNSC मध्ये नेमकं काय घडलं?






