इशाक दार यांनी अमेरिकेत जाऊन इराणच्या अणुकार्यक्रमाची गुपिते केली उघड? पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्टीकरण ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Ishaq Dar Marco Rubio Meeting Washington : आंतरराष्ट्रीय राजकारणात सध्या अमेरिका, इराण आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यातील राजनैतिक संबंधांना घेऊन एकच खळबळ उडाली आहे. पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी गेल्या महिन्याच्या अखेरीस, म्हणजेच २९ मे २०२६ रोजी वॉशिंग्टनचा दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांची भेट घेतली. मात्र, या भेटीनंतर एका माजी सीआयए (CIA) विश्लेषकाने केलेल्या दाव्यामुळे संपूर्ण जगात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. इशाक दार यांनी या बैठकीत इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाशी संबंधित अत्यंत संवेदनशील आणि गुप्त माहिती अमेरिकेला दिल्याचा दावा या विश्लेषकाने केला आहे. या गंभीर आरोपावर आता पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने तातडीने अधिकृत प्रतिक्रिया देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
अमेरिकेच्या केंद्रीय गुप्तचर संस्थेचे (CIA) माजी विश्लेषक लॅरी जॉन्सन यांनी एका अज्ञात सूत्राचा हवाला देत हा खळबळजनक दावा केला आहे. जॉन्सन यांच्या मते, इशाक दार आणि मार्को रुबियो यांच्यात झालेल्या अत्यंत गोपनीय चर्चेदरम्यान, इराण आपले अणुस्वातंत्र्य टिकवण्यासाठी आणि अण्वस्त्र विकसित करण्यासाठी कोणत्या थराला जाऊ शकतो, याची गुप्त माहिती पाकिस्तानने अमेरिकेला दिली. या माहितीमध्ये इराण ‘एनपीटी’ (NPT – न्युक्लियर नॉन-प्रोलिफेरेशन ट्रीटी) मधून बाहेर पडण्याची शक्यता आणि अण्वस्त्रांच्या चाचणीचे संकेत यांचा समावेश होता, असा दावा माध्यम अहवालात करण्यात आला. या गुप्त माहितीमुळे अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो हे देखील थक्क झाले होते, असे सांगण्यात आले. या दाव्याने विशेषतः आखाती देशांमध्ये आणि राजनैतिक वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : SPIEF 2026 : मोदींवर दबाव आणणे पाश्चात्त्यांनाच पडणार महागात; पुतिन यांनी भारताला गौरवले जगातील ‘सर्वोच्च विश्वासार्ह भागीदार
हा वाद वेगाने पसरत असल्याचे पाहून पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने (Foreign Office) गुरुवारी आपल्या वीकली प्रेस ब्रीफिंगमध्ये यावर अधिकृत आणि कडक शब्दांत स्पष्टीकरण दिले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते ताहिर अंद्राबी यांनी हे वृत्त पूर्णपणे फेटाळून लावले. अंद्राबी यांनी सांगितले की, “इशाक दार यांनी अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांच्याशी इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत कोणतीही संवेदनशील माहिती शेअर केलेली नाही. माध्यम अहवालात केले जात असलेले सर्व दावे पूर्णपणे निराधार, काल्पनिक आणि तथ्यहीन आहेत.” पाकिस्तानने कोणत्याही प्रकारचा इंटेलिजन्स डेटा अमेरिकेला दिला नसल्याचे त्यांनी ‘कॅटेगरीकली आणि अनइक्विव्होकली’ (स्पष्टपणे आणि निःसंदिग्धपणे) नाकारले आहे.
US Secretary of State Marco Rubio has said that the United States and India are only weeks away from concluding a long-awaited trade agreement. He added that Washington and New Delhi are nearing completion of the pact. Mr Rubio highlighted India as a key strategic partner in… pic.twitter.com/2f9Xyxd7A6 — All India Radio News (@airnewsalerts) June 4, 2026
credit – social media and Twitter
प्रवक्ते ताहिर अंद्राबी यांनी पुढे बोलताना सांगितले की, अशा प्रकारच्या खोट्या आणि मनघडत अफवा पसरवण्यामागे एक विशिष्ट हेतू आहे. सध्या मध्यपूर्वेमध्ये (Middle East) शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि चालू असलेल्या आंतरराष्ट्रीय चर्चांमध्ये अडथळा आणण्यासाठी हे केले जात आहे. पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यातील चर्चा ही केवळ प्रादेशिक शांतता, द्विपक्षीय सहकार्य, व्यापार आणि दहशतवादविरोधी मोहिमांवर केंद्रित होती. त्यात कोणत्याही तिसऱ्या देशाच्या सुरक्षिततेला किंवा गोपनीयतेला धक्का पोहोचवणारी चर्चा झाली नाही. माध्यमांनी अशा प्रकारच्या संवेदनशील विषयांवर कोणत्याही अधिकृत पुष्टीकरणाशिवाय वृत्त देणे टाळावे, असे आवाहनही त्यांनी केले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Solar Eclipse: शतकातील सर्वात मोठे सूर्यग्रहण 6 मिनिटे आणि 23 सेकंद दिसणार; जाणून घ्या ते भारतात दिसेल का?
वास्तविक पाहता, या बैठकीकडे संपूर्ण जगाचे डोळे लागले होते कारण गेल्या काही महिन्यांपासून अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेला संघर्ष थांबवण्यासाठी पाकिस्तान हा मुख्य ‘मध्यस्थ’ (Mediator) म्हणून काम करत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला फेब्रुवारीमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात लष्करी हल्ले झाले होते, ज्यानंतर एप्रिलमध्ये एक तात्पुरता युद्धविराम (Ceasefire) लागू झाला. तेव्हापासून दोन्ही देश पाकिस्तानच्या माध्यमातून एकमेकांना शांततेचे संदेश पाठवत आहेत. एप्रिल महिन्यात पाकिस्तानने अमेरिका आणि इराण यांच्यात थेट शांतता चर्चेचे आयोजनही केले होते. याच पार्श्वभूमीवर इशाक दार हे वॉशिंग्टनला गेले होते. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाकडून इराणसोबतच्या करारावर अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता असतानाच हा ‘माहिती लीक’ झाल्याचा वाद समोर आला आहे.






