भारताला हवाई क्षेत्र बंद केल्यामुळे पाकिस्तानला कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे (फोटो - सोशल मीडिया)
Pakistan airspace crores loss : इस्लामाबाद : यंदाच्या वर्षी भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. भारतावर झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेतली. तसेच ऑपरेशन सिंदूर करुन दहशतवाद्यांवर वचक देखील बसवला. यानंतर भारताने २३ एप्रिल २०२५ रोजी सिंधू पाणी करारही स्थगित केला. यामुळे दुखावलेल्या पाकिस्तानने भारताला हवाई क्षेत्रासाठी बंदी घालण्यात आली. मात्र यामुळे भारतापेक्षा पाकिस्तानला जोरदार अर्थिक फटका बसला आहे.
भारताने पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी हल्ल्याचे सडेतोड उत्तर दिल्यानंतर पाकिस्तानकडून काही पाऊले उचलण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये भारतासाठी हवाई क्षेत्र बंद करण्यात आले. यामुळे भारतीय विमानांना पाकिस्तानवरुन विमान उडवता आले नाही. पण शेजारील देशाचा हा निर्णय त्यांच्यासाठी महागात पडला आहे.
३० जूनपर्यंत भारतीय हवाई क्षेत्र बंद केल्यापासून पाकिस्तानला सुमारे ४.१० अब्ज पाकिस्तानी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. हे नुकसान प्रामुख्याने १००-१५० भारतीय विमान कंपन्यांच्या विमानांमुळे झाले ज्यांच्यासाठी हवाई क्षेत्र बंद करण्यात आले होते.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पाकिस्तानने हवाई क्षेत्र बंद करण्याचा निर्णय का घेतला?
या संपूर्ण प्रकरणावर, पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की पाकिस्तानच्या केंद्रीय मंत्रालयाला हवाई क्षेत्र बंद करण्याचा पूर्ण अधिकार आहे. देशाच्या सुरक्षा आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी देशाच्या केंद्र सरकारने हवाई क्षेत्र बंद करण्याचे हे पाऊल उचलले आहे. कारण देशाच्या एकता आणि अखंडतेपेक्षा काहीही वर नाही. अगदी त्याच्या आर्थिक उत्पन्नापेक्षाही जास्त नाही. २०१९ मध्येही दोन्ही देशांमध्ये असाच सीमा तणाव निर्माण झाला होता ज्यामध्ये पाकिस्तानला ५४ दशलक्ष डॉलर्सचे नुकसान सहन करावे लागले होते.
सिंधू पाणी करारानंतर पाकिस्तानने भारतीय हवाई क्षेत्र बंद केले असले तरी, पाकिस्तान विमानतळ प्राधिकरणाने म्हटले आहे की २०१९ च्या तुलनेत २०२५ मध्ये देशाला फारसे उत्पन्नाचे नुकसान झाले नाही. एकूण उत्पन्न २०१९ मध्ये ५०८००० डॉलर्सवरून २०२५ मध्ये ७६०००० डॉलर्स झाले आहे. यावरून हे स्पष्ट होते की पाकिस्तान इतर क्षेत्रांमधूनही उत्पन्न मिळवत आहे. सध्या, ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पाकिस्तानमधील भारतीय हवाई क्षेत्र बंद आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पाकिस्तानमधील वृत्तपत्र असलेल्या डॉनमध्ये या पाकिस्तानच्या नुकसानीबाबत माहिती देण्यात आली आहे. 24 एप्रिल पासून हवाई क्षेत्र बंद झाले असून यामुळे नुकसान झाले आहे. पाकिस्तानने भारतीय नोंदणीकृत विमाने तसेच भारतीय विमान कंपन्याकडून चालवण्यात येणारी विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करण्यात आले होते. 24 एप्रिल ते 30 जूनच्या काळामध्ये बंदीमुळे दररोज १०० ते १५० विमान उड्डाणांवर याचा परिणाम th झाला. तसेच पाकिस्तानच्या हवाई हद्दीतील वाहतूक जवळजवळ २० टक्क्यांनी घटली. यामुळे ओव्हरफ्लाइंग शुल्कातून होणारे पीएएचे उत्पन्न घटले, अशी माहिती डॉनच्या बातमीत देण्यात आली आहे.