(फोटो सौजन्य: X)
प्रजासत्ताक दिनापूर्वी मोठा घातपात टळला? हाय सिक्युरिटी परिसरातून संशयित कार जप्त; महिलेला अटक
प्रियकराचे कर्ज फेडण्यासाठी थरार
पाली जिल्ह्याची रहिवासी असलेल्या प्रिया सेठने तिचा प्रियकर दीक्षांत कामरा याचे कर्ज फेडण्यासाठी झोटवाडा येथील दुष्यंत शर्माला ‘डेटिंग ॲप’च्या माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. २ मे २०१८ रोजी प्रियाने दुष्यंतला भेटीसाठी बोलावून फ्लॅटवर नेले, तिथे दीक्षांत आणि त्याचा मित्र लक्ष्य वालिया आधीपासून हजर होते. या तिघांनी दुष्यंतला ओलीस ठेवून त्यात्त्या वडिलांकडे १० लाखांची खंडणी मागितली. वडिलांनी ३ लाख रुपये दुष्यंतच्या खात्यात जमा केले. मात्र, दुष्यंतला सोडल्यास आपण पकडले जाऊ या भीतीने तिघांनी त्याची गळा आवळून हत्या केली.
जयपूरमध्ये लागली चुकीची संगत
प्रिया सेठ ही सुशिक्षित कुटुंबातील आहे. तिचे आजोबा प्राचार्य होते, वडील कॉलेज लेक्चरर आणि आई शिक्षिका आहे. दहावी-बारावीत उत्तम गुण मिळाल्यामुळे पालकांनी तिला पुढील शिक्षणासाठी जयपूरला पाठवले होते. मात्र, तिथे ती चुकीच्या मार्गाला लागली. महागड्या छंदापायी तिने तरुणांना जाळ्यात ओढणे सुरू केले. याच दरम्यान तिची ओळख मॉडेलिंग करणाऱ्या दीक्षांतशी झाली आणि ते लिव्ह-इन मध्ये राहू लागले.
दुष्यंतने स्वतःला करोडपती सांगितले
दुष्यंतने प्रियाला डेटिंग ॲपवर आपण दिल्लीचे असून करोडपती असल्याचे सांगितले होते. याच संपत्तीच्या मोहाने प्रियाने त्याचा बळी घेण्याचा कट रचला.
आता याला काय म्हणावं? 60 फूट लांब पूल रातोरात चोरीला; पोलिसांनीही डोक्याला लावला हात
नवरदेव हनुमान प्रसादचा इतिहास
नवरदेव हनुमान प्रसाद याने २ ऑक्टोबर २०१७ रोजी शिवाजी पार्क येथे तायक्वांदो खेळाडू संतोष शर्मा हिचा पती बनवारी लाल आणि त्यांच्या चार मुलाची हत्या केली होती, हत्येनंतर तो उदयपूरला पळून गेला, तपासात असे समीर आले की, संतीष आणि हनुमान यांचे प्रेमसंबंध होते, संतोष हनुमानपेक्षा १० वर्षांनी मोठी होती. प्रेमापोटी संतोषने आपल्या पतीला आणि मुलांना वाटेतून दूर करण्यासाठी हनुमानला सागितले होते.






