China Storms : चीनमध्ये निसर्गाचा दुहेरी कहर! हुबेईत वादळामुळे ८ जणांचा बळी; 'Bavi' चक्रीवादळाचाही धोका उंबरठ्यावर (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मीडिया रिपोर्टनुसार, सोमवारी (०६ जुलै) संध्याकाळी आलेल्या भीषण वादळ कडकडाट विजा आणि मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. सध्या युद्धतपातळीवर बचाव कार्य सुरु आहे. अवघ्या काही तासांतच हुबेईतील हुआंगशी, हुआंगगांग, एझोऊ आणि झियानिंग या शहरांमध्ये ताशी १४९ वेगाने वारे वाहत आहे. काही भागांमध्ये वज्रवादळेही पाहायला मिळाली असल्याचे सरकारने म्हटले. यामुळे अनेक घरांची छते उडाली आहे. याचा हजारो नागरिकांना फटका बसला आहे.
A violent wedge tornado struck the Huanggang–Ezhou region of Hubei, China, on Sunday evening, causing widespread destruction, with fatalities reported. pic.twitter.com/86vbbl6kw6 — Weather Monitor (@WeatherMonitors) July 6, 2026
चीनच्या राष्ट्रीय हवामान विभादाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. देशातील सुमारे २० कोटी लोकसंख्या असलेल्या भागांत मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि वज्रवादळाच्या धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.
गुआंग्शी, जिआंग्सू आणि शानदोंग प्रांतांत पुढील २४ तासांत २६० मिमीपर्यंत पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यामुळे पूर आणि भूस्खलनाचा धोका वाढला आहे. या अतिवृष्टीचा परिणाम चीनच्या शेतीवर होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे अर्थव्यवस्थेवरही मोठा परिणाम होऊ शकतो.
याशिवाय प्रशांत महासागरातील बावी या चक्रीवादळामुळेही चीनची चिंता वाढली आहे. हे चक्रीवादळ तैवानच्या दिशेनेही अतिवेगाने सरकत असून किनारी भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांना सुरक्षिकत ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
⚠️ BREAKING: A powerful wedge tornado struck the Huanggang–Ezhou region in Hubei Province, China, crossing Yanglan Lake and leaving significant damage and reported fatalities. Tornado – Huanggang – Hubei – China – 龙卷风 pic.twitter.com/BjrkhsjvHk — GeoTechWar (@geotechwar) July 6, 2026






