व्हर्सा : अमेरिकेप्रमाणेच (USA) आता युरोपमध्ये (Europe) भारतीय नागरिकावर (Indian Citizen) वर्णद्वेषी हल्ला (Racist Attack) झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेसंबंधीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral On Social Media) होत असून, यामुळे भारतीयांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
पोलंडमधील (Poland) व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एक यूएस नागरिक भारतीय व्यक्तीला पॅरासाइट (परजीवी) आणि जेनोसाइडर (नरसंहार करणारा) असे संबोधत आहे. पोलंडमधील या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या भारतीय नागरिकाची ओळख अद्याप पटलेली नसून, व्हिडिओमध्ये भारतीय सदर व्यक्तीला विरोध करताना दिसत आहे. तसेच, तू हा व्हिडिओ का बनवत आहे? असा प्रश्न भारतीय नागरिक या व्यक्तीला विचारत आहे. दरम्यान या दोन व्यक्तीमध्ये नेमका वाद कोणत्या कारणामुळे झाला, याचे समलेले नाही.
He’s from America but is in Poland because he’s a white man which makes him think he has the right to police immigrants in “his homeland”
Repulsive behavior, hopefully, he is recognized pic.twitter.com/MqAG5J5s6g— ?_Imposter_?️ (@Imposter_Edits) September 1, 2022
व्हिडीओ बनवणारा अमेरिकन नागरिक, तुम्ही आमच्या जातीचा नरसंहार करत आहात, तुम्ही पोलंडमध्ये का आहात? असा प्रश्न विचारत असून तुम्ही आमच्या पोलंडवर आक्रमण करू शकता असे तुम्हाला वाटते का? तुमचा स्वतःचा देश आहे, तुम्ही तिथे का जात नाही? असा सवाल करीत आहे. पोलंड फक्त पोलिश नागरिकांसाठी असून तुम्ही पोलिश नसल्याचे म्हणत असल्याचे दिसत आहे.