या तंत्रज्ञानामुळे रशिया आणि चीनची झोप उडाली आहे. दोन्ही देशांनी यामुळे जागतिक संतुलन बिघडू शकते अशी भीती व्यक्त केली आहे. एका संयुक्त निवेदनात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी ट्रम्प यांच्या या गोल्डन डोम प्रणालीवर तीव्र आक्षेप घेतला आहे. यामुळे महातसत्तांमधील अण्वस्त्रांचा समोतल ढासळून आंतरराष्ट्रीय तणाव वाझू शकतो असे रशिया-चीनचे म्हणणे आहे. अमेरिकेच्या या कारवाईला भडकाऊ म्हणून संबोधले आहे.
अमेरिकेने परदेशी क्षेपणास्त्र हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी एक प्रणाली तयार करण्याची घोषणा केली आहे. ही प्रणाली अत्यंत प्रगत, बहु-स्तरीय हवाई आणि अंतराळ-आधारित क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली आहे.
या प्रणालीमध्ये अंतराळात हजारो उपग्रह आणि सेन्सर्स नेटवर्क तैनात केले जातील. यामुळे शत्रू देशाने हल्ला करताच त्याचा शोध घेत धोक्याची तीव्रता तपासेल. याचा अंदाज येता अचूकपणे जमिनीवरुन, समुद्रातून किंवा अंतराळातून इंटरसेप्टर मिसाइल्स किंवा लेझर वेपन्स फायर करेल. ज्यामुळे शत्रूचे क्षेपणास्त्र हवेतच नष्ट होईल.
ट्रम्प सपकारने या प्रकल्पासाठी सुरुवातील १७५ अब्ज डॉलर इतका खर्च सांगतिला होता. परंतु अमेरिकन कॉंग्रेस बजेट ऑफसने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २० वर्षात १६१ अब्ज ते थेट ५४२ अब्ज डॉलरपर्यंत खर्च होण्याची शक्यता आहे. येत्या ती वर्षाती ही प्रणाली उभी करण्याचे उद्दिष्ट अमेरिकेने ठेवले आहे. मात्र, यामुळे रशिया-चीनला मोठा धोका निर्माण झाल्याचे तत्ज्ञांचे म्हणणे आहे.
Pulwama हल्ल्याचा बदला? मास्टरमाइंड हमजा बुर्हान ठार; हत्येमागे भारताच्या ‘या’ कुख्यात गँगचा हात?






