पुतिन, डोनाल्ड ट्रम्प, झेलेन्स्की (फोटो- सोशल मीडिया)
Russia vs Ukraine War : रशिया आणि युक्रेनचे युद्ध अजूनही संपलेले नाही. त्यांच्यात युद्ध सुरु असतानाच युक्रेनने रशियावर खळबळजनक आरोप केला आहे. ज्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचेही टेन्शन वाढले आहे. कारण, गेल्या अनेक दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रशिया आणि युक्रेनच्या युद्धावर तोडगा काढण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत. मात्र यावर अजूनही काहीच मार्ग निघाला नसून, त्यातल्या त्यात रशियाकडून वारंवार अमेरिकेवर हल्ले सुरू आहे.
हेही वाचा : सौदी अरेबियामध्ये पोलीस अन् गुंडांमध्ये चकमक; गोळी लागून एका भारतीय नागरिकाचा मृत्यू
रशियाकडून हल्ले सुरु असतानाच रशियाच्या युद्धनीतीचा नवा डाव उघडकीस आला आहे. रशियाच्या या भयावह युद्धनीतीमुळे संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे. युद्धासंदर्भात रशियाचा आक्रमकपणा उघड होत असल्याचा दावा करण्यात येत आहे. याच संदर्भात युक्रेनवर रशियाने काही महिनात सगळ्यात घातक 9M729 मिसाईलचा हल्ला केल्याचा धक्कादायक दावा युक्रेनचे परराष्ट्रमंत्री आंद्रेई सिबिहा यांनी केला आहे.
युक्रेनचे परराष्ट्रमंत्री आंद्रेई सिबिहा यांनी असा दावा केला आहे की, गेल्या काही दिवसांपासून 9M729 या मिसाईलचे हल्ले रशियाकडून करण्यात येत होते. अमेरिकेने 2019 मध्ये या क्षेपणास्त्राच्या निर्मितीमुळे INF करारातून माघार घेतली होती.
एक ग्राऊंड-लॉन्च क्रुझ मिसाईल म्हणून 9M729 याची निर्मिती करण्यात आली. 2500 किमी मिसाईलची रेंज असून हे कोणत्याही युरोपातील भागाला भेदू शकते. त्यामुळे 2019 मध्ये अमेरिकेने याचा विध्वंसक लक्षात घेऊन यावर बंधन घातले होते. तसेच, अशी क्षेपणास्त्र बनवणे म्हणजे अण्वस्त्र नियंत्रण कराराच उल्लंघन केल्याची भूमिका अमेरिकेने घेतली होती. त्यामुळेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा करार रशियासोबत रद्द करायचा निर्णय घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार, रशियाकडून तीन महिन्यात या मिसाईलने जवळपास 23 वेळा हल्ला करण्यात आला. याआधीही 2022 मध्येही हल्ला करण्यात आला. अलीकडेच रशियाच्या 9M729 या क्षेपणास्त्राने युक्रेनमधील एका गावाला लक्ष्य केल्याने त्या हल्ल्यात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
रशियाकडून अण्वस्त्र नियंत्रण कराराचे उल्लंघन झाल्याने सगळ्यांचेच टेन्शन वाढले आहे. डोनाल्ड ट्रम्पकडून युद्ध थांबवण्याचा प्रयत्न होत असून रशियाच्या या आक्रमक भूमिकेमुळे युक्रेनच नव्हे तर संपूर्ण जगाचीच धडधड वाढली आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला विराम कधी लागणार? असाही सवाल अन्य देशांकडून उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा : डोनाल्ड ट्रम्प आता ‘या’ देशावर नाराज; ख्रिश्चन धर्मासाठी मोठा धोका असल्याचं म्हणत ‘वॉचलिस्ट’मध्ये टाकलं






