Saudi-Houthi Attacks : हुथींच्या सौदीवरील हल्ल्यामुळे शाहबाज-मुनीर चिंतेत; पाकिस्तानही युद्धात मारणार उडी? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
…तर UN वरील विश्वास उडेल; UNSC मध्ये सुधारणांवर भारताचा पुन्हा जोर; संयुक्त राष्ट्रांना गंभीर इशारा
गेल्या काही महिन्यांपसून पाकिस्तान मध्यपूर्वेतील राजनैतिक दुवा म्हणून स्वत:ला सादर करत आहे. अमेरिका आणि इराणमधील वाद सोडवण्याचा प्रयत्न शाहबाज आणि मुनीर करत आहे. पाकिस्तानने दोन्ही देशांना शांततेने मतभेद सोडवण्याचे आवाहन केले आहे.
याच वेळी सौदी अरेबिया आणि पाकिस्तानमध्ये मोठा संरक्षण करार करण्यात आला होता. या करारानुसार, दोन्ही देश एकमेकांना मदत करण्यास बांधील आहेत. सौदी अरेबियामध्ये हजारो पाकिस्तानी सैनिक तैनात करण्यात आले आहेत. तसेच अनेक लढाऊ विमानेही तैनात केली आहे.
पाकिस्तान आणि सौदी अरेबियातील संरक्षण करारानुसार, सौदी अरेबियावर कोणताही हल्ला झाल्यास, तो पाकिस्तानवरील हल्ला असणार आहे. गेल्या काही दिवसात अमेरिका-इराण युद्ध पुन्हा पेटले असून सौदी अरेबियावर हल्ला होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत हुथींच्या हल्ल्यामुळेही पाकिस्तानला युद्धात सहभागी व्हावी लागले.
एकीकडे मध्यस्थीची भूमिका निभावून आपली प्रतिमा पुन्हा चांगली करण्याचा प्रयत्न करत असताना सौदी-हुथींमधील तणावामुळे पाकिस्तान युद्धात सहभागी झाल्यास त्याच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात. तर दुसरीकडे सौदी अरेबियाशी केलेल्या करारामुळे पाकिस्तान सौदीला दिलेल्या वचन निभावण्यास बांधील आहे.
दुसरीकडे पाकिस्तानने चीनच्या मदतीने अमेरिका आणि इराणला शांतता बाळगण्याचे आवाहन केले आहे. दोन्ही देशांनी लष्करी संघर्षाऐवजी शांततेतून समस्या सोडवावी असे म्हटले आहे. मध्यपूर्वेतील वाढत्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर हे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, अमेरिकेच्या सततच्या हल्ल्यांमुळे परिस्थिती बिकट झाली असून इराणनेही माघार घेण्यास नकार दिला आहे. अशा परिस्थितीत सौदीवरील हल्ल्यानंतर पाकिस्तानची युद्धात एन्ट्री होते का याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.
काय चाललंय ? हुतींची इराण अमेरिका युद्धात पुन्हा एन्ट्री ,जगाचे टेन्शन वाढले






