श्रीलंकेच्या नौदलाकडून भारतीय मच्छीमारांना अटक (फोटो- टीम नवराष्ट्र)
नवी दिल्ली: भारताची आणि श्रीलंकेची सागरी सीमा ही एक आंतरराष्ट्रीय सीमा आहे. आंतरराष्ट्रीय सीमा परवानगीशिवाय पार करणे हे कायद्याने गुन्हा आहे. दरम्यानया श्रीलंकेने भारताच्या १२ नागरिकांना अटक केली आहे. श्रीलंकेच्या नौदलाने ही कारवाई केली आहे. अवैध मासेमारीच्या आरोपाखाली श्रीलंकेच्या नौदलाने १२ नागरिकांना अटक केली आहे. हे सर्व जण भारतीय मच्छिमार असल्याचे म्हटले जात आहे. श्रीलंकेकडून करण्यात आलेल्या कारवाईत आतापर्यंत ४६२ मच्छीमाराना अटक करण्यात आली आहे. श्रीलंकेच्या नौदलाने त्यांच्या बोटी देखील जप्त केल्या आहेत.
अवैध मासेमारीच्या आरोपाखाली श्रीलंकेच्या नौदलाने १२ भारतीय मच्छीमार नागरिकांना अटक केली आहे. श्रीलंकेच्या सीमेत घुसून अवैधरित्या मासेमारी केल्याच्या आरोपखाली नौदलाने त्यांना अटक केली आहे. तसेच श्रीलंकेच्या नौदलाने भारतीय मच्छीमारांची बोट देखील जप्त केली आहे. एका निवेदनातून याची माहिती देण्यात आली आहे. श्रीलंकेच्या नौदलाने १२ लोकांना अटक केल्याने आता अटक झालेल्या मच्छिमार नागरिकांची संख्या ४६२ वर पोहोचली आहे.
श्रीलंकेच्या नौदलाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. उत्तरेकडील जाफना प्रांतातील पॉइंट पेड्रो किनाऱ्याजवळ त्यांची बोटही जप्त करण्यात आली आहे. या प्रसिद्धीपत्रकात सांगण्यात आल्यानुसार, काकेसंथूराई बंदरात १२ मच्छीमाराना नेण्यात आले आहे. श्रीलंकेच्या नौदलाने २०२४ या वर्षात ४६२ मच्छीमाराना अटक केली आहे. तसेच आतापर्यंत ६२ बोटी देखील जप्त केल्या आहेत.
या मच्छिमारांना कायदेशीर कारवाईसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. श्रीलंकेच्या मत्स्यमंत्रालयाने सांगितले की, दोन्ही देशांच्या सीमेमध्ये असे प्रकार वारंवार घडतात. या सातत्याने निर्माण होणाऱ्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी अथवा त्यातून तोडगा काढण्यासाठी १२ सदस्यांचे भारतीय शिष्टमंडळ मंगळवारी श्रीलंकेत येणार आहे. अनेकदा मच्छिमार बांधव मासेमारी करण्याच्या ओघात नकळतपणे आंतरराष्ट्रीय सीमा पार करतात. त्यामुळे त्यांना भारताच्या किंवा श्रीलंकेच्या नौदलाकडून अटक केली जाते.
हेही वाचा: श्रीलकेंच्या नौदलाकडून भारतीय मच्छीमारांना अटक; एम.के. स्टॅलिन यांचे एस. जयशंकर यांना पत्र
ऑगस्ट महिन्यात देखील श्रीलंकेची कारवाई
श्रीलंकेच्या नौदलाने भारतीय मच्छिमारांना अटक केली आहे. भारतीय मच्छिमारांना श्रीलंकेच्या प्रादेशिक जलक्षेत्रात अवैध शिकार केल्याप्रकरणी आणखी ११ भारतीय मच्छिमारांना अटक केली होती. एका अधिकृत अहवालानुसार, या वर्षी आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या भारतीय मच्छिमारांची संख्या ४६२ वर पोहोचली आहे. या घटनेनंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना पत्र लिहिले आहे. श्रीलंकेने वारंवार केलेली ही कारवाई चिंताजनक असल्याची खंत त्यांनी आपल्या पत्रात व्यक्त केली आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना पत्र लिहिले आहे. “मी वारंवार अधोरेखित केले आहे की अशा घटना चिंताजनक असून त्या वारंवार घडत आहेत. एकट्या 2024 मध्ये 324 मच्छिमार आणि 44 नौका श्रीलंकेच्या नौदलाने पकडल्या होत्या. तामिळनाडूतील मच्छिमारांना वारंवार अटक करण्यात येत असल्याने त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ज्याचा त्यांच्या उदरनिर्वाहाच्या साधनांवर गंभीर परिणाम होत आहे. असे स्टॅलिन यांनी आपल्या पत्रात लिहीले आहे.