इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
तेहरान: सौदी अरेबिया आणि इराणमधील संबंध गेल्या काही काळापासून नाजूक परिस्थितीत आहे. पण अलीकडेच एका घटनेने दोन्ही देशांतच्या संबंधामध्ये पुन्हा एकदा तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती. नुकतेच एका इराणी नागरिकाला हज यात्रेदरम्यान अटक करण्यात आली आहे. यामुळे राजकीय आणि धार्मिक मतभेद पुन्हा नाजूक होण्याच्या स्थितीवर आहेत. याच पार्श्वभूमीवर इराणचे परराष्ट्रा मंत्री अब्बास अराघची यांनी सौदीसोबतचे संबंध निवळण्यासाठी सौदी अरेबियाला भाऊ म्हणून संबोधले आहे.
अब्बास अराघची यांनी, एक्सवर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “नुकत्याच घडलेल्या घटनेमुळे सौदी अरेबिया सोबतचे संबंध नाजूक टप्प्यातून जात आहे. तसेच धार्मिक आणि राजकीय मतभेद देखील निर्माण झाले आहे. तसेच इराणी नागरिकांना हज यात्रेसाठी पाठवण्यात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी मी हज संघटनेच्या सहकाऱ्यांशी संपर्कात आहे.
तसेच परराष्ट्र मंत्री अराघची यांनी, इराण आणि सौदी संबंधांबद्दल बोलताना म्हटले की, सध्या संबंध तणावपूर्ण आहे. पण सौदी अरेबियाचे इराणच्या परराष्ट्र धोरणात विशेष स्थान आहे. इराण आपले बंधुत्वाचे संबंध कायम ठेवेल. यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ देणार नाही.”
अराघती यांच्या या विधानाने सौदी अरेबिया आणि इराणमधील बिघडलेल्या संबंधांच्या अटकळीवर रोख लागली आहे. परंतु नुकत्याच घडलेल्या घटनेवर अद्याप सौदीने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
Iran in no uncertain terms condemns any attempt to harm Muslim unity, particularly in the spiritual atmosphere of the Hajj. We are determined to not allow anyone to sabotage relations with our brotherly neighbors, including the progressive path of Iran and Saudi Arabia.
The… pic.twitter.com/l4OE9JqPBk
— Seyed Abbas Araghchi (@araghchi) May 27, 2025
२०१५ नंतर सौदी अरेबियाने इराणच्या हज यात्रेकरुंसाठी उड्डाण सेवाही पुन्हा सुरु केली आहे. १७ मे रोजी सौदी अरेबियाच्या फ्लायनास एअरलाईन्सने तेहरानच्या इमाम खोमेना या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन इराण यात्रेकरुंसाठी पहिले उड्डाण केले होते. यामुळे ३५ हजार इराणी यात्रेकरुंना हजला जाण्याची संधी मिळाली.
मध्य पूर्वेतील सौदी अरेबिया आणि इराण एकमेकांचे कट्टर शत्रू होते. दोन्ही देशांमध्ये धार्मिक मतभेद निर्माण झाले होते. इराण हा शिया मुस्लिमांचा देश, तर सौदी अरेबिया सुन्नी मुस्लिमांचा देश आहे. मात्र, २०१५ मध्ये हज यात्रेदरम्यान १३९ इराणी यात्रेकरुंचा मृत्यू झाला होता. यामुळे दोन्ही देशात तणाव निर्माण झाला. तसेच २०१६ मध्ये सौदी अरेबियाने शिया धर्मगुरू अल-निम्र यांना फाशीची शिक्षा दिली. यामुळे दोन्ही देशांतील तणाव आणखी बिघडला.