Typhoon Bavi : चीन-फिलिपिन्समध्ये बावी चक्रीवादळाचा हाहा:कार; आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Israel Election 2026 : इस्रायलमध्ये निवडणुकांचा बिगुल वाजला; नेतन्याहू पुन्हा सत्तेत येणार?
फिलिपिन्सच्या ऑफिस ऑफ सिव्हिल डिफेन्सने दिलेल्या माहितीनुसार, बावी चक्रीवादळ आणि सक्रिय नैऋत्य मान्सूनमुळे मुसळधार पाऊस पडत आहे. या जोरदार पावसाचा तडाखा अनेक भागांना बसला असून अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत.
अचानक आलेल्या पुरात बुडून अनेकांचा मृत्यू झाला असून १२ जण अद्याप बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. सध्या बेपत्ता झालेल्या लोकांचा शोध घेण्याचे काम बचाव पथके करत आहेत. या नैसर्गिक आपत्तीमुळे देशभरातील ५.६२ लाख नागरिकांवर परिणाम झाला आहे.
सततच्या मुसळधार पावसामुळे अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. हजारो लोकांना सुरक्षित ठिकाणी लोकांना हलविण्यात आले आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे पूर आणि भूस्खलनाची भीतीही वाढली आहे.
या बावी चक्रीवादळाने चीनमध्येही प्रचंड विध्वंस घडवून आणला आहे. याचा सर्वाधिक फटका चीनच्या झेजियांग प्रांताला बसला आहे. बावी चक्रीवादळाने शनिवारी (११ जुलै) रात्री झेजियांग प्रदेशात दोन वेळा जोरदार धडक दिली. यानंतर हे वादळ हळूहळू पुढील भागांकडे सरकले असून याची तीव्रता कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
चीनच्या आपत्कालीन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १९४९ नंतर जुलै महिन्यात पहिल्यांदाच झेजियांगवर ही सर्वात शक्तिशाली नैसर्गिक आपत्ती आली. या वादळामुळे गेल्या २४ तासांता मध्य आणि दक्षिण भागात ५० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस नोंदवला गेला आहे.
या चक्रीवादळामुळे चीनच्या समुद्रात लाटा उसळल्या असून किनारी भागांसह पूर, भूस्खलन आणि पाणी साचल्याच्या घटना वाढल्या आहेत. दोन्ही देशांत युद्धपातळीवर बचाव आणि मदत कार्य सुरु आहे. खराब हवामानामुळे यामध्ये अडथळा येत असून त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
Bangkok Pub Fire : बँकॉकमध्ये भीषण दुर्घटना! पबमध्ये लागलेल्या आगीत २७ जणांचा मृत्यू, अनेक जखमी






