यूकेमध्ये हिंदूविरोधी घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी एक नवीन व्यासपीठ सुरू करण्यात आले आहे ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Anti Hindu Hate Monitoring Center UK : आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेषतः युरोपीय देशांमध्ये राहणाऱ्या भारतीय आणि हिंदू समुदायाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. युनायटेड किंगडम ( United Kingdom) मध्ये हिंदूंच्या विरोधात होणाऱ्या द्वेषपूर्ण गुन्ह्यांमध्ये (Hate Crimes) कमालीची वाढ झाली आहे. या वाढत्या घटनांचा अचूक मागोवा घेण्यासाठी, भेदभावाची नोंद करण्यासाठी आणि हिंदू समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी ब्रिटनमध्ये पहिल्यांदाच ‘अँटी-हिंदू हेट मॉनिटरिंग सेंटर’ (Anti-Hindu Hate Monitoring Center) नावाचे एक नवीन व्यासपीठ सुरू करण्यात आले आहे. ब्रिटनमधील हिंदू संघटना आणि नेत्यांनी एकत्र येऊन घेतलेला हा निर्णय तेथील वाढत्या तणावाचे गांभीर्य अधोरेखित करतो.
ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये गेल्या काही महिन्यांत धार्मिक तेढ आणि द्वेषाच्या घटना झपाट्याने वाढल्या आहेत. प्रसिद्ध प्रसारमाध्यम ‘बीबीसी’ने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार, लंडनमध्ये यावर्षी धार्मिक कारणांवरून होणाऱ्या द्वेषपूर्ण गुन्ह्यांमध्ये २३ टक्क्यांची वाढ झाली आहे. आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांच्या कालावधीत अशा ८३९ घटनांची नोंद झाली होती, जी यंदा याच कालावधीत वाढून १,०३२ वर पोहोचली आहे. ही वाढ लंडन पोलिसांसाठी आणि स्थानिक प्रशासनासाठी अत्यंत चिंतेचा विषय बनली आहे. यामध्ये तोडफोड, ऑनलाइन छळवणूक आणि प्रत्यक्ष मारहाणीच्या घटनांचा समावेश आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump Jr Wedding : ‘मी गेलो तरी मारला जाईन, नाही गेलो तरी…’ ट्रम्प यांनी आपल्याच मुलाच्या लग्नाबद्दल का म्हटले असे?
या उपक्रमाच्या समर्थकांनी आणि संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रिटनमध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या सरकारी किंवा पोलीस यंत्रणा हिंदूविरोधी घटनांची स्वतंत्र किंवा अचूक नोंद ठेवण्यात अपयशी ठरत होत्या. अनेकदा हिंदू समाजातील लोक भीतीपोटी, सामाजिक दबावामुळे किंवा तक्रार नोंदवण्याची योग्य पद्धत माहीत नसल्यामुळे पोलिसांकडे जात नव्हते. परिणामी, हिंदूविरोधी गुन्हेगारीची खरी व्याप्ती कधीच जगासमोर येत नव्हती. गेल्या वर्षी प्रसिद्ध झालेल्या ‘ब्रिटनमधील हिंदूंवरील द्वेष आणि भेदभावाची चौकशी’ (An Inquiry into Hate and Discrimination Against Hindus in Britain) या विशेष अहवालातही हिंदूंच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र मजबूत यंत्रणा नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर हे नवीन केंद्र सुरू करण्यात आले आहे.
🛡️🌍 A new Anti Hindu Hate Monitor platform has been launched in the UK 🇬🇧 The initiative aims to track and document incidents targeting the Hindu community 📋⚖️ Could dedicated monitoring platforms help tackle hate and discrimination more effectively?👇#UK #Hindu #Community… — Economic Times (@EconomicTimes) May 21, 2026
credit – social media and Twitter
‘अँटी-हिंदू हेट मॉनिटरिंग सेंटर’ हे एक केंद्रीय व्यासपीठ म्हणून काम करेल. ब्रिटनच्या कोणत्याही कोपऱ्यात राहणाऱ्या हिंदू नागरिकावर जर धार्मिक कारणावरून अन्याय झाला, छळ झाला किंवा ऑनलाइन ट्रोलिंग झाले, तर तो या प्लॅटफॉर्मवर आपली तक्रार नोंदवू शकेल. हे केंद्र केवळ तक्रारी गोळा करणार नाही, तर त्या घटनांचे सखोल विश्लेषण करेल, हिंदूविरोधी द्वेषाचे नेमके स्वरूप काय आहे याचा डेटा तयार करेल आणि तो वेळोवेळी प्रसिद्ध करेल. यामुळे ब्रिटन सरकारवर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाब निर्माण करणे सोपे होणार आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Crude Oil : होर्मुझचं वर्चस्व पूर्ण कमी करणार; आता डोक्यावरची टांगती तलवार काढून टाकण्यासाठी UAEची ‘ADNOC’ सज्ज
लंडन असेंब्लीचे भारतीय वंशाचे सदस्य कृपेश हिरानी यांनी या उपक्रमाचे जाहीर स्वागत केले आहे. ते म्हणाले की, काही वर्षांपूर्वी त्यांनी स्वतः लंडन सिटी हॉलमध्ये हिंदूंच्या सुरक्षेचा आणि त्यांच्याविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी या घटनांची अचूक माहिती देणारी कोणतीही स्वतंत्र यंत्रणा नव्हती. आता समाज या दिशेने एकत्र आला आहे ही अत्यंत सकारात्मक गोष्ट आहे. या प्लॅटफॉर्मवर जमा होणारा डेटा थेट लंडनच्या ‘महानगर पोलिसांकडून’ (Metropolitan Police) अधिकृतपणे मान्यताप्राप्त व्हावा, हे आपले पुढील ध्येय असल्याचे हिरानी यांनी सांगितले. त्यांनी यूकेमधील संपूर्ण हिंदू समाजाला आवाहन केले आहे की, त्यांनी कोणत्याही भीतीशिवाय या प्लॅटफॉर्मचा वापर करून स्वतःसोबत घडलेल्या घटनांची नोंद करावी.






