US Travel Ban : अमेरिकेत 'No Entry'! ट्रम्प यांनी ३९ देशांवरील प्रवासबंदी वाढवली ; जाणून घ्या कधीपासून लागू होणार (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ट्रम्प यांची मांडूळाची चाल! अनेक टीकांनंतर गायले पंतप्रधान मोदींचे गुणगाण
ट्रम्प यांनी राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देत इमिग्रेशन धोरणे कडक केली आहेत. मंगळवारी (१६ डिसेंबर) ट्रम्प यांनी आणखी सात देश आणि पॅलेस्टिंनीवर अमेरिकेत प्रवासबंदी लागू केली आहे. यामध्ये इतर १५ देशांच्या नागरिकांवरील बंदीमध्ये वाढ करण्यात आली आहे. यामुळे आता एकूण ३९ देशांवर ट्रम्प प्रशासनाने बंदी घातली आहे.
ट्रम्प प्रशासनाने मंगळवारी जाहीर केलेल्या घोषणेनुसार, बुर्किना फासो, माली, नायजर, दक्षिण सुदानस, सीरियावर प्रवास बंदी लागू केली आहे. यामध्ये पॅलेस्टिनींवर देखील बंदी घातली आहे. याशिवाय लाओस, सिएरा लिओन या देशांवरही पूर्ण प्रवासबंदी लागू करण्यात आली आहे.
यामध्ये अंगोला, अँटिग्वा आणि बारबुडा, बेनिन, कोट डी आयव्होअर, डोमिनिका, गॅबॉन, द गॅम्बिया, मलावी, मॉरिटानिया, नायजेरिया, सेनेगल, टांझानिया, टोंगा, झांबिया आणि झिम्बाब्वे या देशांच्या नागरिकांवर काही प्रमाणात प्रवेश निर्बंध लादले आहेत. तर बुरुंडी, क्युबा, टोगो आणि व्हेनेझुएलाच्या नागरिकांवरली निर्बंध वाढवले आहेत.
याशिवाय अफगाणिस्तान, म्यानमार, चाड, काँगो, गिनी, एरिट्रिया, हैती, इराण, लिबिया, सोमालिया, सुदान आणि येमेन या देशांतील नागरिकांना अमेरिकेत आधीपासून नो एन्ट्री आहे.
व्हाईट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, या सर्व देशांवरील पूर्ण प्रवासबंदी आणि प्रवास निर्बंध हे १ जानेवारी २०२६ पासून लागू होणार आहे. ट्रम्प प्रशासनाने याचे स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, अमेरिकेत वाढते दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी, व्हिसा स्क्रीनिंग सिस्टम, व्हिसा ओव्हरस्टे दर, अंतर्गत संघर्ष या कारणांमुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे.
गेल्या महिन्यात २६ नोव्हेंबर २०२५ रोजी वॉशिंग्टन डीसी येथे दोन नॅशनल गार्ड्स सैनिकांवर हल्ला करण्यात आला होता. एका अफगाण नागरिकाने हा हल्ला केला होता. ज्यामुळे ट्रम्प यांनी तीव्र संताप व्यक्त केला. शिवाय सीरियामध्ये देखील दोन दिवसापूर्वीच अमेरिकेच्या तळावर हल्ला झाला होता, ज्यामध्ये दोन अमेरिकन सैनिक आणि एक अमेरिकन दुभाषिख ठार झाले होते. अमेरिकन नागरिकांवरील वाढत्या हल्ल्यांमुळेच ट्रम्प प्रशासनाने हा निर्णय घेतला होता.
Ans: ट्रम्प प्रशासनाने 39 देशांवरील प्रवासबंदी वाढवली आहे?
Ans: ट्रम्प प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, हा निर्णय राष्ट्रीय सुरक्षा, वाढते दहशतवादी धोके, कमकुवत व्हिसा तपासणी प्रणाली, व्हिसा ओव्हरस्टे दर, या सर्व कारणांमुळे ३९ देशांवर प्रवासबंदी लागू केली आहे.
Ans: अमेरिकेत ३९ देशांवरील प्रवासबंदी १ जानेवारी २०२६ पासून लागू होणार आहे.






