लष्करी विमान, साखळदंड अन् अवैध भारतीयांचे हाल? विमानातील धक्कादायक VIDEO व्हायरल (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या ॲक्शनमोडमध्ये असून एकामागून एक धक्कादायक निर्णय घेत त्यावर अमंलबजावणी करत आहेत. त्यांच्या प्रमुख निर्णयांपैकी एक म्हणजे अवैध स्थलांतरितांना देशातून हद्दपार करणे. आतापर्यंत डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन, मेक्सिको, कॅनडा आणि भारतातीय बेकायदेशीर स्थलांतरितांना मायदेशात परत पाठवले आहे. या अवैध प्रवाशांना परत पाठवण्यासाठी त्यांनी लष्करी विमानंचा वापर केला असून लोकांच्या हातापायाला साखळदंड बांधून त्यांना विमानत बसवले आहे.
सध्या याचा 104 भारतीयांना परत पाठवल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत अमेरिकेच्या ल्ष्करी विमानाने बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना भारतात परत पाठवले जात आहे. हे विमान बुधवारी (5 फेब्रुवारी) रोजी अमेरिके एक लष्करी विमान पंजाब अमृतसर उतरले होते.
USBP and partners successfully returned illegal aliens to India, marking the farthest deportation flight yet using military transport. This mission underscores our commitment to enforcing immigration laws and ensuring swift removals.
If you cross illegally, you will be removed. pic.twitter.com/WW4OWYzWOf
— Chief Michael W. Banks (@USBPChief) February 5, 2025
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ अमेरिकन अधिकाऱ्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. युएस बॉर्ड पेट्रोल चीफ मायकेल डब्ल्यू. बॅंक्सने हा व्हिडिओ शेअर केला असून कॅप्शनमध्ये बेकायदेशीर स्थलांतरितांना USBP आणि भागीदारांनी यशस्वीरित्या भारतात परत पाठवले आहे. यासाठी लष्करी वाहतुकीचा पार केला असून हे आतपर्यतचे सर्वात लांबचे हद्दपार उड्डाण आहे. ही मोहीम इमिग्रेशन कायदा लागू करण्याची आणि त्वरित अमंलबजावणीची आमची वचनबद्धता अधोरेखित करते. याशिवाय पुन्हा एकदा नियमांचे उल्लंघन केल्यास याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असे म्हटले आहे.
विमानात 104 भारतीय
या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसत आहे की, हाता पायाला साखळदंड बांधलेला असून यामध्ये 104 भारतीयांना बसवण्यात आले असल्याचे म्हटले आहे. यामध्ये 79 पुरुष आणि 25 महिल सामील आहेत. या विमानाने गुजरातमधील 33, हरियाणामधील 33, पंजाबमधील 30, महाराष्ट्रातील 3, उत्तर प्रदेशातील 3 आणि चंदीगडमधील 2 भारतीय परतले आहेत. ‘ हे अमेरिकेचे विमान बेकायदेशीर स्थलांतरितांना घेऊन येणारे C-17 लष्करी विमान टेक्सासहून भारताकडे रवाना झाले.
परराष्ट्र मंत्र्यांची प्रतिक्रिया
भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर राज्यसभेत अवैध स्थलांतरावर बोलताना परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले, “जर एखाद्या देशाचे नागरिक परदेशात अवैधपणे राहत असतील, तर अशा प्रत्येक देशाने त्यांच्या नागरिकांना परत देशात घ्यायलाच पाहिजे. हे त्यांचे कर्तव्य आहे, असे म्हटले.