Vladimir Putin : भारतानंतर पाकिस्तानवरही पुतिनकडून कौतुकांचा वर्षाव; म्हणाले, 'तो मोठा देश...' (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
US-Iran Conflict : इराणवर आणखी हल्ले नाहीत? पण ट्रम्प यांनी आखली ‘रेड लाईन’, काय आहे नवी रणनीती?
सेंट पीटर्सबर्ग येथे आंतरराष्ट्रीय फोरमध्ये पत्रकारांशी संवाद साधाताना पुतिन यांनी प्रश्न विचारण्यात आला होता. पत्रकारांनी त्यांना विचारले की, रशियाचे पाकिस्तान आणि चीनसोबत अतिशय चांगले संबंध आहेत. अशा वेळी भारताच्या संरक्षण हिंताचे रक्षण करण्याची ते हमी देतील का?
यावर उत्तर देताना पुतिन यांनी, भारत आणि पाकिस्तानमधील सीमावादाचा उल्लेख केला. दोन्ही देशांमधील गुंतागुंत आम्हाला माहिती आहे असे त्यांनी म्हटेल. पाकिस्तान एक मोठा देश असून तो कोणत्चायीह नियंत्रणाखाली नाही. त्याचे अनेक देशांसोबत बहुअयामी संबंध आहेत. यामुळे त्यांना चीनसोबत सहकार्य वाढवण्याचा विचार करावाच लागले. अलीकडे चीनसोबत सर्वजण संबंध प्रस्थापित करु इच्छित आहेत.
त्यांनी भारत-चीन संबंधावर बोलताना म्हटले की, दोन्ही देशांमध्ये संबंधही अत्यंत नाजूक आणि बहुआयामी आहेत. यामुळे त्यामध्ये हस्तक्षेपण करणे योग्य नाही असेही त्यांनी म्हटले. तसेच दोन्ही देशातील सीमा वादावर बोलताना म्हटले की, आम्ही मित्रांशी चर्चा केली असून ते परस्पर सहाकार्याने वाद मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत. असे पुतिन यांनी म्हटले. पुतिन यांनी भारत-चीनला रशियात चर्चेची ऑफरही देण्यात आली होती. तसेच त्यांनी हे स्पष्ट केले की, रशिया-चीन संबंधामुळे भारताला आणि रशिया-भारत संबंधामुळे चीनला कोणताही त्रास नाही.
पुतिन यांनी भारताचे विशेष कौतुक केली. त्यांनी म्हटले की, आतापर्यंत महासत्ता देशाने भारतावर रशियाशी संबंधावरुन दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु आमचा मित्र या दबावापुढे धुकलेला नाही. भारत असे दबाव झुगारून लावत आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. तज्ज्ञांच्या मते, पुतिन यांच्या या वक्तव्यावरुन रशिया भारत, चीन आणि पाकिस्तान तिन्ही देशांशी संतुलित संबंध ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.






