अमेमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि जेन्ट्री थॉमस बीच (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर १० मे रोजी दोन्ही देशांत युद्धविरामाची घोषणा करण्यात आली. याच वेळी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या मध्यस्थीने युद्धबंदी झाल्याचा दावा केला. पण भारताने स्पष्ट केले की, युद्धबंदीमध्ये कोणत्याही तिसऱ्या देशाचा सहभाग नव्हता. परंतु यावरुनही ट्रम्प पलटले आणि अमेरिकेने कोणतीही मध्यस्थी न केल्याचे म्हटले.
ट्रम्प यांचे सुरु नेमके अचानक कसे बदलले? अशा प्रश्न सर्वांना पडत होता. याच वेळी जेंट्री थॉमस यांचे नाव समोर येऊन लागले. या व्यक्तीमुळे ट्रम्प यांचे सुरताल बदलले असल्याचे म्हटले. आता तुम्हाला प्रश्न पडला असले, ही व्यक्ती नेमकी आहे तरी कोण? आणि या व्यक्तीने असे काय केले की ट्रम्प यांनी भारताविरोधी भूमिका घेतली. असे म्हटले जात आहे की, जेंट्री थॉमस यांचे पाकिस्तान आणि बांगलादेशसी संबंध आहेत. त्यांनी ट्रम्प यांना पाकिस्तान आणि बांगलादेशसंबंधी अशी काही स्वप्ने दाखवली आहेत की, त्यांनी भारतविरुद्ध टिप्पण्या केल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, थॉमस जेंट्री बीच हे टेक्सासमधील गुंतवणूक आमि डोनाल्ड ट्रम्प यांचे ज्युनियर कॉलेज मित्र आहे. त्यांनी सुरुवातीपासूनच पाकिस्तान, तुर्की आणि बांगलादेशला साथ दिली आहे. आश्चर्याकारक बाब म्हणदजे ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर १० दिवसांतटच जेंट्री थॉमस यांनी पाकिस्तान भेट दिली होती.
जेंट्री थॉमस स्वत:ला ट्रम्प यांच्या जवळचे मित्र म्हणून संबोधतात. त्यांच्या पाठिंब्याने थॉमस यांनी गुंतवणूकदारांच्या टीमसह पाकिस्तानला भेट दिली होती. त्यांनी पाकिस्तानमध्ये त्यांची टिम ब्रिज ग्लोबल नावाच्या कंपनीच्या नेतृत्त्वाखाली पाकिस्तानात काम करते.
पाकिस्तानच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, थॉमस यांनी पाकिस्तान पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची भेट घेतली. त्यांनी अमेरिकेला पाकिस्तानची चिंता असल्याचे सांगितले. तसेच पाकिस्तानला अमेरिकेचा प्रमुख चेहरा म्हणून देखील संबोधले. थॉमस यांनी शाहबाज शरीफ यांना कराची आणि इस्लामाबादचे भविष्य बदलण्याचे आश्वासन दिले. तसेच पाकिस्तानला अब्जावधी डॉलर्सच्या गुंतवणुकीचे आमिष दाखवले.
जेंट्री यांनी पाकिस्तानच्या ॲपेक्स एनर्जी कंपनीसोबत करार केला. या करारांतर्गत सिंधू नदीच्या काठावर सापजलेल्या प्लेसर गोल्डचा साठ्यांचा शोध आणि विकास करण्याचे काम होणार आहे, पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, प्लेसर गोल्डटी किंमत अंदाजे ५० डॉलर्स ट्रिलियन आहे. या वर्षाच्या सुरुवातीला पाकिस्तानच्या राष्ट्रीय अभियांत्रिकी सेवानी सिंधू नदीजवळ ८० हजार कोटींचा मोठा प्लेसर गोल्डची खान सापडल्याचा दावा केला होता.
दरम्यान जेंट्री थॉमस यांनी केलेल्या करारांतर्गत अमेरिका पाकिस्तानला नदीतून सोने बाहेर काढण्यासाठी पदत करणाक आहे. पाकिस्तान आणि अमेरिकेने संयुक्तपणे उत्खननासाठी भागीदार म्हणून कार्यकरण्याचे वचनबद्धता दर्शवली आहे.
जेंट्री थॉमस यांनी केवळ पाकिस्तानच नव्हे, तर तुर्की आणि बांगलादेशला देखील भेट दिली आहे. बांगलादेशला उर्जा आणि खनिज क्षेत्रात गुंतवणूक करण्याची इच्छा थॉमस यांनी मोहम्मद युनूस यांच्याकडे व्यक्त केली आहे.
दुसरीकडे तुर्कीला व्हाईट ब्रिज ग्लोबल कंपनीच्या माध्यमातून दुबईमध्ये कंपनी टेरामध्ये ५०-५० चा भागीदारीत मोठा करारा घडवून आणण्यात आला आहे.
या सर्व घटना भारतासाठी चिंतेचे कारण बनत आहेत. बांगलादेश, पाकिस्तान आणि तुर्कीसोबत सध्या भारताचे तणावपूर्ण संबंध आहेत. अशा अमेरिका भारताच्या शत्रू देशांना पाठिंबा देत असल्यास ही भारतासाठी धोक्याची घंटा आहे.