Amazon Flipkart वर 'Jawa All Stars'चा धमाका ( सौजन्य - सोशल मीडिया ) 
ऑटोमोबाइल

काय सांगता? आता ऑनलाईन मागवा तुमची आवडती Jawa बाइक! Amazon Flipkart वर 'Jawa All Stars'चा धमाका; असं कराल बुकिंग?

Jawa Yezdi Festive Offer : सणासुदीच्या काळात ग्राहकांचा खरेदीचा प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी जावा येझदी मोटरसायकल्सने आपली संपूर्ण ‘जावा ऑल स्टार्स’ श्रेणी Amazon.in आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध केली आहे.

Ankita Karangutkar
  • जावा येझदी मोटरसायकल्सचा मोठा निर्णय!
  • 'जावा ऑल स्टार्स' श्रेणी आता अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टवर उपलब्ध
  • ई-कॉमर्सवरून करा थेट बुकिंग

Jawa Yezdi Festive Offer : जावा येझदी मोटरसायकल्सने आपल्या 2026 च्या सणासुदीच्या उपक्रमाचा भाग म्हणून संपूर्ण ‘जावा ऑल स्टार्स’ श्रेणी Amazon.in आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध करून दिली आहे. ‘ऑल स्टार्स’ श्रेणीच्या लाँचिंगनंतर हे पाऊल उचलण्यात आले असून, यामुळे एका अखंड आणि सुलभ ऑनलाइन खरेदी प्रक्रियेद्वारे 42 एफजे, 42 बॉबर आणि 42 ओजीची आतापर्यंतची सर्वात मोठी प्रगत आवृत्ती रायडर्सच्या अधिक जवळ आली आहे. ( Jawa Yezdi Festive Offer ) 

जावा ऑल स्टार्सचे प्रतीक हे जावा मोटरसायकल चालवणाऱ्या व्यक्तींचा, त्यांच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा आणि स्वतःला आत्मविश्वासाने सादर करण्याच्या त्यांच्या अनोख्या शैलीचा सन्मान आहे. हे प्रतीक ‘कॅरेक्टर, कंडक्ट आणि करेज’ या तत्त्वांचे प्रतिनिधित्व करते, जे सर्व जावा रायडर्समध्ये समान असते—मग ते कुठूनही आलेले असोत. जावा ऑल स्टार्स श्रेणी तीन वेगवेगळ्या मोटरसायकलींच्या माध्यमातून ही जीवनशैली प्रत्यक्ष साकारते, ज्यातील प्रत्येक गाडी जावाच्या अस्सल आणि स्वतंत्र ओळखीचे प्रतिनिधित्व करते.

इंजिनिअरिंगच्या जोरावर स्वतंत्र अस्तित्व टिकवून

सणासुदीच्या काळात पोर्टफोलिओमध्ये केलेला हा बदल म्हणजे जावाचा आपल्या रायडर्सच्या भावना समजून घेण्याचा एक मार्ग आहे. जावा 42 एफजे ही ऑल स्टार्सचे प्रतीक धारण करणारी पहिली मोटरसायकल होती. त्यानंतर 42 बॉबरने या श्रेणीत आपल्या फॅक्टरी-कस्टम स्वरूपाची स्वतंत्र ओळख जोडली. जावा 42 ओजीच्या सर्वात मोठ्या प्रगत आवृत्तीने ही नवी श्रेणी पूर्ण केली आहे; जिथे प्रत्येक मोटरसायकल आपल्या वेगळेपणाने उठून दिसणाऱ्या डिझाइन आणि उद्देशपूर्ण परफॉर्मन्स इंजिनिअरिंगच्या जोरावर आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवते.

जावा ऑल स्टार्स श्रेणीला उत्स्फूर्त प्रतिसाद

क्लासिक लेजेंड्सचे सह-संस्थापक अनुपम थरेजा म्हणाले, “आपण नेमके कोण आहोत हे पक्के ठाऊक असणाऱ्या रायडर्सना जावाने नेहमीच आकर्षित केले आहे. ते केवळ ट्रेंड म्हणून कोणत्याही गोष्टीचे अनुकरण करत नाहीत किंवा केवळ इतरांपेक्षा वेगळे दिसण्यासाठी लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत. जावा ऑल स्टार्स कोड कॅरेक्टर, कंडक्ट आणि करेज याच सामायिक भावनेला दाद देतो, जी या तीन वेगवेगळ्या मोटरसायकलींच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होते. आपण सणासुदीच्या दिवसांत पदार्पण करत असताना, जावा ऑल स्टार्स श्रेणीला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद रायडर्समध्ये आमच्या मोटरसायकलींची वाढती पसंती दर्शवतो. तसेच ही संपूर्ण श्रेणी Amazon.in आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध केल्यामुळे मोटारसायकल खरेदीचा हा प्रवास पूर्वीपेक्षा अधिक सुलभ झाला आहे.”

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर मोटरसायकलींची माहिती

जावा ऑल स्टार्स श्रेणी Amazon.in आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध झाल्यामुळे, रायडर्स आता ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर मोटरसायकलींची माहिती मिळवू शकतात आणि खरेदीच्या दिशेने पुढचे पाऊल टाकू शकतात. हा उपक्रम जावाच्या 450+ डीलरशिप नेटवर्कला पूरक ठरतो, ज्यामुळे संभाव्य ग्राहकांना ही श्रेणी जाणून घेण्याचा आणि ऑनलाइन खरेदी पूर्ण करण्याचा आणखी एक पर्याय मिळतो.

ऑनलाइन खरेदीची प्रक्रिया कशी चालते:

1. आपली आवडती जावा ऑल स्टार्स मोटरसायकल निवडा आणि Amazon.in किंवा फ्लिपकार्टवर लागू असलेली एक्स-शोरूम किंमत भरा.

2. अधिकृत स्थानिक डीलर आपल्या ऑर्डरची खात्री करेल आणि उर्वरित पेमेंट तसेच कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी मदत करेल.

3. नोंदणी आणि विम्याची औपचारिकता पूर्ण होताच, मोटरसायकल आपल्या जवळच्या जावा-येझदी डीलरशिपवर हँडओव्हरसाठी तयार असेल.

ओनरशिप अ‍ॅश्युरन्स प्रोग्राम:

जावा येझदी मोटरसायकल्स ग्राहकांना त्यांच्या संपूर्ण मालकीच्या प्रवासात सहकार्य करण्यासाठी आपला 'ओनरशिप ॲश्युरन्स प्रोग्राम' सातत्याने देत आहे. यामध्ये समाविष्ट आहे:

• 4-year/50,000-किमी स्टँडर्ड वॉरंटी*

• 6 वर्षांपर्यंत वाढीव वॉरंटीचे पर्याय*

• 8 वर्षांपर्यंत रोडसाइड असिस्टन्स*

• देशव्यापी कव्हरेजसह 5 वर्षांपर्यंत AMC*

• देशभरातील 450+ विक्री आणि सेवा केंद्रांवर उपलब्ध असलेला सर्वसमावेशक ओनरशिप सपोर्ट.

Mumbai News: भारतावर अतिवृष्टी, पूर आणि दुष्काळाचे संकट! महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थितीची चिन्हे

मिनी महाबळेश्वर गारठलं! तापमान थेट एकेरी अंकात; पर्यटकांचा ओढा वाढला

Kolhapur Drink and Drive: कोल्हापुरात मद्यधुंद कारचालकाने दोघा भावांना चिरडले; गोकुळच्या माजी अध्यक्षांच्या मुलाला अटक

जुन्या कॅसेटला मिळाली नवी ओळख! 44 वर्षांपूर्वी फ्लॉप झालेलं गाणं GTA 6 मुळे पुन्हा ट्रेंडमध्ये

Bajra Soup: थंडीच्या दिवसांमध्ये सकाळच्या नाश्त्यात करा बाजरीच्या सूपचा समावेश, पित्ताच्या त्रासापासून मिळेल सुटका