Emraan Hashmi Viral Video   (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
Entertainment

Emraan Hashmi Viral Video: जिनिलियाच्या कानातल्यांसोबत इम्रानने केलं असं काही... रितेश देशमुखचा चेहरा पाहण्यासारखा

भिनेत्री जिनिलिया देशमुख आणि अभिनेता इम्रान हाशमी सध्या ‘गनमास्टर जी 9’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दोघे एका सिंगिंग रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाले होते. यावेळी इम्रानने गुडघ्यावर बसून जिनिलियाला प्रपोज केले आणि दोघांनी एकत्र डान्सही केला.

Riddhi Vanne
  1. इम्रान हाशमीने ओठांनी काढले जिनिलियाचे कानातले

  2. रोमँटिक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर इम्रान ट्रोल

  3. ‘गनमास्टर जी 9’ चित्रपट 27 नोव्हेंबर 2026 रोजी प्रदर्शित

अभिनेत्री जिनिलिया देशमुख सध्या चर्चेत आहे ती तिच्या नव्या सिनेमामुळे. गनमास्टर जी 9 या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता इम्रान हाशमी दिसणार आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जिनिलिया आणि इम्रान सिंगिंग रिअॅलिटी शोमध्ये गेले होते. पण तिथे घडलेल्या एका प्रसंगामुळे इम्रान हाशमीला ट्रोल केलं जातं.

• स्टेजवर नेमकं काय झालं?

शोमध्ये इम्रानचा रोमँटिक अंदाज पुन्हा बघायला मिळाला. यावेळी इम्रान-जिनिलिया दोघं मंचावरच्या एका बाकावर बसले होते. अभिनेत्याने जिनिलियाला गुडघ्यावर बसून प्रपोज केलं. तसंच, दोघांनी एकत्र डान्स पण केला. पण त्यानंतर इम्रानने केलेल्या एका कृतीमुळे तो नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे.त्याचं झालं असं की, इम्रान आणि जिनिलिया हे सिनेमातल्या दर्द-ए-दिल-ए-जिगर या गाण्यावर रोमँटिक सीन सादर करत होते. त्याचवेळी इम्रानने चक्क त्याच्या ओठांनी जिनिलियाच्या कानातलं इअररिंग काढलं. हा प्रसंग बघून प्रेक्षकांनी मोठमोठ्याने ओरडत दाद द्यायला सुरुवात केली. तर जिनिलियाही हसताना दिसली. पण हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी मात्र इम्रानवर टीका करायला सुरुवात केली आहे.

• नेटकऱ्यांच्या कमेंट्स

या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एकाने कमेंट केली आहे की, कल्पना करा, 'एखाद्या मुलीने रितेशसोबत असं केलं असतं तर. आपल्याला आणखी एक मीम प्रतिक्रिया मिळाली असती' तर एकाने म्हटलं की, जिनिलियाने अशा प्रमोशनल अॅक्टिव्हिटीमध्ये भाग घ्यायला नको होतं.तर, काहींनी जिनिलियाच्या या व्हिडिओला सपोर्ट केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, ते फक्त त्यांच्या चित्रपटातल्या एका दृश्याची पुनरावृत्ती करत होते. तर, काहींनी त्यांच्या पडद्यावरच्या केमेस्ट्रीची पण स्तुती केली आहे.

• चित्रपट कधी रिलीज होणार?

'गनमास्टर जी 9' हा चित्रपट 27 नोव्हेंबर 2026 रोजी जगभरातल्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची टक्कर आयुष्मान खुराना आणि शर्वरी अभिनीत व सूरज बडजात्या दिग्दर्शित 'ये प्रेम मोल लिया' या चित्रपटाशी होईल.

Kabaddi Tournament : निवारा हिड इंडिया महिलांच्या उपउपांत्य फेरीत; पुरुषांत चार संघांची आगेकूच

कांदा लागवडीचा हंगाम जोरात; मजुरीचे दर हजाराच्या पार; वाढत्या खर्चाने शेतकरी मेटाकुटीला

PCB: पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ! महिला सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये फक्त ८ जणींना संधी, १२ अनुभवी खेळाडूंचा पत्ता कट

Rohit Sharma: आला रे आला, मुंबईचा राजा आला! 'हिटमॅन' पुन्हा Mumbai Indians चा कर्णधार

Maharashtra News : ‘सेवा दूत अभियान’ १ डिसेंबरपासून राज्यभर राबवणार; लोककल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे रवींद्र चव्हाण यांचे आवाहन