Living away from your family? Is a distance growing in your relationships? (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)  Living away from your family? Is a distance growing in your relationships? (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
लाइफ स्टाइल

Family: कुटुंबापासून दूर राहताय? नात्यांमध्ये वाढतोय दुरावा? कुटुंबाशी जवळीक टिकवण्यासाठी फॉलो करा 'या' खास टिप्स!

Family: नोकरी, शिक्षण किंवा व्यवसायामुळे कुटुंबापासून दूर राहावे लागत असेल, तर नकळत नात्यांमध्ये भावनिक दुरावा निर्माण होऊ शकतो. व्यस्त दिनक्रमामुळे आई-वडील आणि भावंडांशी संवाद कमी होतो. मात्र, काही सोप्या सवयींच्या मदतीने दूर राहूनही नात्यांमधील प्रेम, विश्वास आणि आपुलकी टिकवता येते. जाणून घ्या कुटुंबाशी जवळीक कायम ठेवण्यासाठी ७ खास टिप्स!

siddhi
  • कुटुंबापासून दूर राहत असाल तरी दररोज फोन किंवा व्हिडिओ कॉलद्वारे घरच्यांशी संवाद साधा.

  • सण, वाढदिवस आणि खास प्रसंगी शुभेच्छा देऊन तसेच छोट्या भेटवस्तू पाठवून प्रेम व्यक्त करा.

  • मनातील गोष्टी मोकळेपणाने सांगा, गैरसमज दूर करा आणि वेळ मिळेल तेव्हा कुटुंबीयांना प्रत्यक्ष भेटण्याचे नियोजन करा.

नोकरी, शिक्षण किंवा व्यवसायाच्या निमित्ताने अनेकांना आपल्या कुटुंबापासून दूर राहावे लागते.त्यामुळे आपल्या आईबाबांसोबत किंवा भावंडांसोबतच्या नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो. सुरुवातीला फोन आणि व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संवाद सुरू असतो. मात्र, कालांतराने कामाचा व्याप, व्यस्त दिनक्रम आणि वैयक्तिक जबाबदाऱ्यांमुळे कुटुंबीयांशी बोलणे कमी होते.त्यामध्ये वेळ ना बोलण्यासाठी वेळ न जुळणे, यामुळे नकळत नात्यांमध्ये भावनिक दुरावा निर्माण होऊ शकतो. कुटुंबापासून दूर राहत असतानाही नात्यांमधील प्रेम, विश्वास आणि आपुलकी टिकवणे महत्त्वाचे आहे.कारण आपण जेव्हा घरी जाल तेव्हा गोष्टी बद्दल्यात असे वाटत नाहीत.यासाठी काही सोप्या टिप्स नक्कीच उपयोगी ठरू शकतात.

१. दररोज संवाद साधा.

कुटुंबापासून दूर राहत असाल तर दररोज काही मिनिटे तरी घरच्यांशी बोला. त्यासाठी तुमच्या कुटुंबियांबरोबर बोलून एक ठराविक वेळ निवड त्यांच्याशी विडिओ कॉल वर बोला.आई-वडील, भाऊ-बहीण किंवा जोडीदार यांची विचारपूस करा. दिवसभरात काय घडले, याबद्दल एकमेकांना सांगा. यामुळे संवाद कायम राहतो आणि एकमेकांच्या आयुष्यातील घडामोडी समजतात.

२. व्हिडिओ कॉलचा आधार घ्या.

केवळ फोनवर बोलण्यापेक्षा अधूनमधून व्हिडिओ कॉल करा. एकमेकांना प्रत्यक्ष पाहिल्यामुळे जवळीक आणि आपलेपणाची भावना वाढते.त्यामुळे तुम्ही तुमच्या घरातच आहात असे वाटेल. त्याचबरोबर तुमच्या आईबाबाना दुरावल्या सारखे वाटणार नाही तुम्ही तूमच्या घरातील छोट्या-मोठ्या गोष्टी व्हिडिओ कॉलवर शेअर करा.व्हिडिओ कॉल ने नेहमी कॉल करा.ज्याने एक रोज बोलण्याची सवय लागेल.

३. सण-समारंभ एकत्र साजरे करा.

दूर राहत असलात तरी सण, वाढदिवस आणि लग्नाचे वाढदिवस विसरू नका. शक्य असल्यास अशा खास प्रसंगी घरी जाण्याचा प्रयत्न करा किंवा भेट पाठवण्याचा प्रयत्न करा, ज्याने तुमचे प्रियजन खुश होतील.प्रत्यक्ष भेटणे शक्य नसेल तर व्हिडिओ कॉलद्वारे आनंद साजरा करा.त्याने तुमच्या शुभेच्छेनेच त्यांना आनंद होईल.

४. एकमेकांना वेळ द्या.

कामाच्या व्यापातून वेळ काढून कुटुंबीयांशी गप्पा मारा. केवळ गरज असेल तेव्हाच फोन करण्याऐवजी सहज संवाद साधा. यामुळे नात्यांमधील भावनिक बंध मजबूत होतात.सूयुती पडेल तेव्हा घरच्यांना भेटण्याचा प्रयत्न करा.

५. मनातील गोष्टी मोकळेपणाने सांगा.

गैरसमज, नाराजी किंवा मनातील दुःख मनात ठेवू नका.तुमच्या आयुष्यात कोणत्या समस्या असतील तर त्या घरातल्याना सांगण्याचा प्रयत्न करा. घाबरून जाऊ नका. गोष्टी मनात ठेवल्यामुळे अधिक त्रास होऊ शकतो. कुटुंबीयांशी मोकळेपणाने बोला आणि एकमेकांचे म्हणणे शांतपणे ऐका. यामुळे गैरसमज दूर होण्यास मदत होते.

६. छोट्या गोष्टींमधून प्रेम व्यक्त करा.

कुटुंबीयांना आवडणाऱ्या गोष्टी लक्षात ठेवा. अधूनमधून प्रेमळ मेसेज, सरप्राइज गिफ्ट किंवा शुभेच्छा पाठवा. अशा छोट्या कृतींमुळे नात्यांमधील आपुलकी टिकून राहते.दरवेळी जास्त मेहनत घेण्याची गरज नसते. तुमच्या छोट्या प्रयत्नातून देखील तुम्ही त्यांना खुश करू शकता.

७. एकत्र भेटण्याचे नियोजन करा.

काही महिन्यांतून एकदा कुटुंबासोबत भेटण्याचे नियोजन करा.ज्याने तुमच्यातील जवळीकता राहण्याला मदत होईल. एकत्र जेवण करणे, फिरायला जाणे किंवा जुन्या आठवणींना उजाळा देणे यामुळे नात्यांमध्ये पुन्हा जवळीक निर्माण होऊ शकते.

कुटुंबापासून दूर राहणे ही परिस्थिती असू शकते; मात्र त्यामुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होऊ देऊ नका. नाती टिकवण्यासाठी महागड्या भेटवस्तूंपेक्षा वेळ, संवाद, विश्वास आणि प्रेम अधिक महत्त्वाचे असते.

Rahul Gandhi Instagram Story: राहुल गांधींनी शेअर केला रितेश आणि जेनेलिया देशमुख यांचा 'तो' व्हायरल फोटो; सोशल मीडियावर खळबळ

गाडी आडवी मारल्याचा राग अनावर अन् थेट पाठलाग करून चिरला गळा! कोल्हापूर-सांगली सीमेवर व्यावसायिकाची निर्घृण हत्या

सामना ड्रॉ मात्र ICC Rankings मध्ये Team India च्या 'या' शिलेदारांची मोठी घौडदौड, थेट...

Zimma 3 January 2027 Release : ‘किल्ला’नंतर अर्चित देवधर पुन्हा अभिनयाच्या मैदानात; ‘झिम्मा ३’मध्ये महत्त्वाची भूमिका

Sangli News: अवघ्या २० मिनिटांत ३५ विषय मंजूर, लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न? इचलकरंजी महापालिकेत विरोधकांचा संताप अनावर