‘भाऊ फ्लेक्स काढा’ ही मोहीमेद्वारे महापौरांना टोला
थेट महापौर मंजुषा नागपूरे यांच्या फ्लेक्सचा फोटो शेअर
अधिकृत अकाऊंटवरून महापालिकेची पोस्ट
Pune Mayor Manjusha Nagpure flex by PMC : पुणे : पुण्यामध्ये सध्या महापालिका अँक्शन मोडमध्ये आली असून अतिक्रमण विरोधात जोरदार कारवाई केली जात आहे. फुटपाथवरील अतिक्रमणे हटवली जात असून रस्स्त्यावर लावण्यात आलेल्या फ्लेक्स विरोधात ‘भाऊ फ्लेक्स काढा’ ही मोहीम राबवण्यात येत आहे. यामध्ये आता महापालिकेने थेट महापौर मंजुषा नागपूरे यांच्या फ्लेक्सचा फोटो शेअर केला आहे.
महापालिका प्रशासनाच्या एक्स या सोशल मीडियावरील अधिकृत अकाऊंटवरून महापौर मंजुषा नागपूरे यांचा फ्लेक्सचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी ड्रेनजेच्या कामामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. या फ्लेक्सवरून महापालिकेने महापौरांना थेट टोला लगावला आहे.
महापालिकेने फ्लेक्सचा फोटो अधिकृत अंकाऊटंवरून शेअर करत लिहिले, ड्रेनेजची तसदी समजू शकतो. फ्लेक्सची तसदी कशाबद्दल? महापालिकेच्या या एक्स पोस्टची सर्वत्र चर्चा रंगली असून महापालिकेने थेट महापौर मंजुषा नागपूरे यांनाच आरासा दाखवल्याची चर्चा रंगली आहे
याचबरोबर पुणे महापालिका प्रशासनाने ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार २०२६’ जाहीर केले असून यामध्ये पहिला क्रमांक हा स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी पहिला किताब पटकावला. वाढदिवसाच्या दिवशीच त्यांना पालिकेने हा किताब दिल्याने चर्चा रंगली.
महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर २४ नोव्हेंबर २०२६ रोजी या पुरस्कारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. राजकीय व्यक्तींसाठी ‘माननीय’ आणि व्यावसायिक जाहिरातींसाठी ‘ब्रँड्स’ अशा दोन श्रेणी करण्यात आल्या आहेत. ‘माननीय’ श्रेणीत सर्वाधिक फ्लेक्स लावणाऱ्या नेत्यांना उपरोधिक शैलीत ‘साहेब’, ‘दादा’ आणि ‘भाऊ’ असे किताब देण्यात आले आहेत. श्रीनाथ यशवंत भिमाले यांना ‘साहेब’, नगरसेवक पृथ्वीराज शशिकांत सुतार यांना ‘दादा’ आणि सुनील नामदेव पांडे यांना ‘भाऊ’ हा किताब देण्यात आला आहे.
पुणे महापालिकेने महापौर मंजुश्री नागपुरे यांचा फ्लेक्स का शेअर केला?
पुणे महापालिकेने आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवर महापौर मंजुश्री नागपुरे यांच्या फ्लेक्सचा फोटो शेअर केला. या फ्लेक्सवर ड्रेनेजच्या कामामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यात आली होती.
महापौरांच्या फ्लेक्सचा फोटो शेअर करत पुणे महापालिकेने काय म्हटले?
महापालिकेने फोटो शेअर करत, ‘ड्रेनेजची तसदी समजू शकतो. फ्लेक्सची तसदी कशाबद्दल?’ अशी मिश्किल टिप्पणी केली. त्यामुळे महापालिकेने थेट महापौरांनाच टोला लगावल्याची चर्चा सुरू झाली.
पुणे महापालिकेने ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार २०२६’ मध्ये कोणाला पहिला क्रमांक दिला?
पुणे महापालिकेने जाहीर केलेल्या ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार २०२६’ मध्ये स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी पहिला क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे, वाढदिवशीच त्यांना हा उपरोधिक किताब मिळाल्याने या पुरस्काराची चर्चा रंगली.