Kabaddi Tournament : निवारा हिड इंडिया महिलांच्या उपउपांत्य फेरीत; पुरुषांत चार संघांची आगेकूच फोटो सौजन्य : सोशल मीडिया
Sports

Kabaddi Tournament : निवारा हिड इंडिया महिलांच्या उपउपांत्य फेरीत; पुरुषांत चार संघांची आगेकूच

मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या 44 व्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेत निवारा हिड इंडिया संघाने महिला गटात उपउपांत्य फेरीत प्रवेश केला. पुरुष गटात जय भवानी, अमरज्योत, शिवनेरी क्रीडा आणि श्री सिद्धिविनायक विजयी झाले. दरम्यान, राज्य स्पर्धेसाठी साहिल यादवच्या नेतृत्वाखाली मुंबई उपनगरचा किशोर संघ जाहीर करण्यात आला.

Rakesh Khedekar
  • जय भवानी, अमरज्योत, शिवनेरी क्रीडा आणि श्री सिद्धिविनायक विजयी

  • 44 व्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेला रंगत

  • किशोर गटाच्या मुंबई उपनगर संघाचे नेतृत्व साहिल यादवकडे

Kabaddi Tournament : मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशन आणि सुधीर मोरे मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 44 व्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत निवारा हिड इंडिया संघाने महिलांच्या उपउपांत्य फेरीत प्रवेश केला. प्रथम श्रेणी पुरुष गटात जय भवानी, अमरज्योत, शिवनेरी क्रीडा आणि श्री सिद्धिविनायक या संघांनी दुसऱ्या फेरीत धडक दिली. ही स्पर्धा विक्रोळी (पश्चिम) येथील पार्कसाइट परिसरातील कैलास कॉम्प्लेक्स रोडवरील महापालिका मैदानावर सुरू आहे.

महिला गटात निवारा हिड इंडिया संघाने सिद्धार्थ क्रीडा संघाचा 38-11 असा एकतर्फी पराभव केला. मध्यंतराला 24-8 अशी भक्कम आघाडी घेणाऱ्या निवारा हिड इंडियाने उत्तरार्धातही आक्रमक खेळ कायम ठेवला. तनुजा लाड आणि इशिका थोपकर यांनी दमदार कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सिद्धार्थच्या वैष्णवी गुरवचा प्रतिकार अपुरा ठरला.

जय भवानीचा दणदणीत विजय

प्रथम श्रेणी पुरुष गटात जय भवानीने स्वयंभू मंडळावर 34-20 अशी मात केली. मध्यंतराला दोन्ही संघ 12-12 अशा बरोबरीत होते. मात्र, उत्तरार्धात केतन शिंदे आणि आकाश पवार यांनी आक्रमक खेळ करत जय भवानीला विजय मिळवून दिला.

अमरज्योत मंडळाने संकेत मोरे आणि दीपक मांढरे यांच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर संभाजी मंडळाचा 35-22 असा पराभव केला. शिवनेरी क्रीडाने ऋषभ सिंग आणि प्रथमेश जावळे यांच्या चढाई-पकडीतील प्रभावी कामगिरीच्या बळावर सक्षम स्पोर्ट्सला 29-15 असे नमविले. श्री सिद्धिविनायकने साई स्पोर्ट्सवर 26-19 असा विजय मिळवला. ओम कवळे आणि ओमकार मोरे यांनी विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. साई स्पोर्ट्सकडून प्रतीक वाडकरने चांगला खेळ केला.

साहिल यादवकडे किशोर संघाचे नेतृत्व

दरम्यान, चिपळूण, रत्नागिरी येथे 1 डिसेंबरपासून होणाऱ्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी मुंबई उपनगर असोसिएशनने किशोर गटाचा संघ जाहीर केला आहे. साहिल यादवकडे संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

संघात स्मित गुदडे, रुद्र क्षीरसागर, नमन राठोड, जयेश शितकर, उमेर खान, मयंक केणे, सोहम घरत, स्मित पयेर, भावेश शितकर, भावेश बोऱ्हाडे, हर्षद कस्तुरे, अतिष साळुंखे आणि विग्नेश भगत यांचा समावेश आहे. हेमंत तोडणकर यांची प्रशिक्षक, तर शैलेश गावडे यांची व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

कांदा लागवडीचा हंगाम जोरात; मजुरीचे दर हजाराच्या पार; वाढत्या खर्चाने शेतकरी मेटाकुटीला

PCB: पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ! महिला सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये फक्त ८ जणींना संधी, १२ अनुभवी खेळाडूंचा पत्ता कट

Rohit Sharma: आला रे आला, मुंबईचा राजा आला! 'हिटमॅन' पुन्हा Mumbai Indians चा कर्णधार

Maharashtra News : ‘सेवा दूत अभियान’ १ डिसेंबरपासून राज्यभर राबवणार; लोककल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे रवींद्र चव्हाण यांचे आवाहन

Nashik News : नाशिकमध्ये महापालिकेच्या रुग्णालयाची दुराव्यस्था; फाटलेल्या गाद्या अन् वॉर्डात मांजरांच्या मुक्तसंचाराने रुग्ण भयभीत